Kidambi Srikanth : किदम्बी श्रीकांतला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक, थोडक्यात GOLD हुकलं, पराभूत होऊनही रचला इतिहास
Badminton World Championships : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे.
Kidambi Srikanth : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने अप्रतिम कामगिरी करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. पण अंतिम सामन्यात सिंगापुरच्या लोह किन येव (Loh Kean Yew) याने श्रीकांतला मात दिल्याने त्याचं सुवर्णपदक हुकलं आहे. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम सामना श्रीकांतने 21-15 आणि 22-20 अशा दोन सेट्समध्ये गमावला.
असा झाला सामना
सामन्याच्या सुरुवातीला श्रीकांतने चांगली सुरुवात केली त्याने 9-7 ची लीड घेतली. पण त्यानंतर सिंगापूरच्या लोहने पुनरागमन करत 11-11 ची बरोबरी साधली. ज्यानंतर सामन्यात एकहाती पुढे जात पहिला सेट लोहने 21-15 ने जिंकला. त्यानंतर दुसरा सेट चुरशीचा झाला. पण लोहने अखेरच्या काही वेळेत अप्रतिम खेळ दाखवत सेट 22-20 ने जिंकला. ज्यामुळे सामनाही लोहने खिशात घातला.
श्रीकांतने रचला इतिहास
श्रीकांतने उपांत्य फेरीमध्ये भारताच्याच लक्ष्य सेनला मात देत अंतिम सामन्यात स्थान मिळवलं होतं. श्रीकांतनं उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनवर 17-21, 21-14, 21-17 असा विजय मिळवला होता. फायनलमध्ये पोहोचल्याने श्रीकांतने याआधीच इतिहास रचला होता. कारण जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिलाच खेळाडू होता. त्यामुळे अंतिम सामन्यात पराभूत होऊनही श्रीकांतने रौप्य पदकावर नाव कोरल्याने त्याने इतिहास लिहिला आहे. भारतीय खेळाडूला प्रथमच या जागतिक स्पर्धेत रौप्य पदक मिळालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ashes 2021-22: अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वीज कोसळली, स्टंप कॅमेऱ्यात फोटो कैद
- 'विराटचा Attitude चांगला, पण आजकाल भांडणं खूप करतो,' सौरव गांगुलीच्या कोहलीला कानपिचक्या
- IPL 2022 : गौतम गंभीरचं IPL मध्ये पुनरागमन, आयपीएल 2022 मध्ये लखनौ संघाचा भाग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha