एक्स्प्लोर
रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा नंबर वन!
पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा ठोकणाऱ्या विराटने कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.

लंडन: इंग्लंडविरुद्धची नॉटिंगहॅम कसोटी खिशात घातल्यानंतर, टीम इंडियाचं रन मशीन अर्थात कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. पहिल्या डावात 97 आणि दुसऱ्या डावात 103 धावा ठोकणाऱ्या विराटने कसोटी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. ताज्या रँकिंगमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाचा हकालपट्टी झालेला कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकलं आहे. विराटच्या खात्यात 937 गुण जमा झाले आहेत. यापूर्वी लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत लौकिकाला साजेशी खेळी करता न आल्याने, विराटला अव्वलस्थान गमवावं लागलं होतं. मात्र आता कोहलीने पुन्हा अव्वलस्थान पटकावलं आहे. कोहलीने कमावलेले 937 इतके गुण हे आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला मिळाले नव्हते. विराटच्या रँकिंगला सध्या कोणत्याही फलंदाजापासून धोका नाही. कारण दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्टीव्ह स्मिथवर वर्षभरासाठी बंदी आहे. तर तिसऱ्या नंबरवर असलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या खात्यात 847 इतके गुण आहेत. त्यामुळे कोहली विल्यमसनपेक्षा खूप पुढे आहे. कोहलीने सध्या चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी केली आहे. तीन कसोटी सामन्यात कोहलीने 2 शतकांसह 440 धावा ठोकल्या आहेत. अजून दोन कसोटी सामने शिल्लक आहेत. संबंधित बातम्या दहा मिनिटांत खेळ खल्लास, भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी विजय क्रमवारीत कोहली घसरला, न खेळताही स्टीव्ह स्मिथ अव्वल
आणखी वाचा























