ICC ODI Ranking : विराट-रोहित टॉपवर कायम, जसप्रीत बुमराहची मात्र घरसण
ICC ODI Ranking : आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नंबर एकवर कायम आहे तर रोहित शर्मा दुसऱ्या नंबरवर आहे. दुसरीकडे गोलंदाजांमध्ये भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे.
ICC ODI Ranking : आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नंबर एकवर कायम आहे तर रोहित शर्मा दुसऱ्या नंबरवर आहे. दुसरीकडे गोलंदाजांमध्ये भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका भारताला 2-1 ने गमवावी लागली. बुमराहला या मालिकेत म्हणावी अशी कामगिरी करता आली. याचाच फटका त्याला क्रमवारीत बसला. आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावरुन बुमराह तिसऱ्या स्थानावर आला आहे, तर अफगाणिस्तानच्या मुजीब उर-रेहमानने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात 700 गुण जमा आहेत. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ड 722 नंबरसह गोलंदाजीत अव्वल स्थानी आहे.
Josh Hazlewood, who picked up six wickets at 30 during the #AUSvIND ODI series, has moved to No.6 in the @MRFWorldwide ICC Men's ODI Bowling Rankings ????
FULL RANKINGS ➡️ https://t.co/lRP67a820b pic.twitter.com/5wZrViPhcU — ICC (@ICC) December 10, 2020
ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या जोश हेजलवूडने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान कायम आहे. विराट 870 गुणांसह एक नंबर एक रोहित 842 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. वन-डे मालिका गाजवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला आहे. भारताविरुद्ध केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा त्याला फायदा झालेला दिसत आहे. याचसोबत डेव्हिड वॉर्नरही आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर आला आहे.
???? One ????, two fifties ???? 249 runs at 83
Australia captain Aaron Finch, who was the top run-scorer in the #AUSvIND ODIs, has moved into the top five in the @MRFWorldwide ICC Men's ODI Batting Rankings ???? pic.twitter.com/U2ZSH5fDCW — ICC (@ICC) December 10, 2020
टी 20 मध्ये राहुल तिसऱ्या स्थानी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्याचा फायदा या दोघांनाही आयसीसीच्या टी-20 च्या लेटेस्ट रॅकिंगमध्ये झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध खेळवण्यात आलेली तीन सामन्यांची टी-20 सीरिज 2-1 ने आपल्या नावे केली आहे. ICC ने टी-20 रॅकिंगमध्ये केएल राहुल आणि विराट कोहलीच्या स्ठानामध्ये सुधारणा केली आहे. विकेटकीपर-फलंदाज राहुलने प्रत्येक एका क्रमांकाने आघाडी घेतली आहे. आयसीसीच्या यादीत केएल राहुलने तिसरं तर विराट कोहलीने आठवं स्थान पटकावलं आहे. कॅनबरामध्ये पहिल्या टी-20 मध्ये अर्धशतक फटकावणारा राहुल ऑस्ट्रेलियाचा सीमित ओव्हर्सचा कर्णधार एरॉन फिंचच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात अंतिम टी-20 सामन्यात 85 धावांची खेळ करणारा विराट कोहलीही एक स्थानाने पुढे आला आहे. इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मलानने फलंदाजांच्या आयसीसी टी-20 आय रॅकिंगमध्ये टॉपवर आहे. आयसीसी टी-20 रॅकिंगच्या टॉप-10 मध्ये कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल आपली जागा तयार करण्यात यशस्वी झाले आहेत.
ICCच्या नव्या टी-20 रँकिंगमध्ये केएल राहुल सर्वाधिक रँकिंग असणारा भारतील फलंदाज आहे. राहुलकडे यंदा 816 पॉईंट्स आहेत. तसेच विराट कोहलीचे 697 पॉईंट्स आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरोधात खेळवण्यात आलेल्या टी-20 सीरीजमध्ये संघात समावेश नव्हता. त्यामुळे रोहित टॉप-10 मध्ये जागा निर्माण करु शकला नाही. 915 पॉईंट्ससोबत इंग्लंडचा डेव्हिड मलान पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजमलाही 871 पॉईंट्स असून तो दुसऱ्या स्थानी आहे.