एक्स्प्लोर

ICC Cricket World Cup 2023 : 34 वर्षांपूर्वी एकाचवेळी पर्दापण अन् आज सोबत काॅमेन्ट्री; भारत पाक महामुकाबल्यात सचिन-वकार युनूसचा 'स्पेशल रुबाब'!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस आपापल्या संघाला चिअर करताना दिसून आले. रवी शास्त्री यांच्यासोबत समालोचन करताना दोघेही दिसून आले. 

अहमदाबाद : वर्ल्डकपमधील (ICC Cricket World Cup 2023) सर्वाधिक रोमांचक मुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणाऱ्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमर होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकी जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजी दिली. पाकिस्तानने दमदार सुरुवात करत 31 शतकात 3 बाद 157 अशी मजल मारली आहे.

दरम्यान, या सामन्यामध्ये एक वेगळाच क्षण पाहायला मिळाला. तो क्षण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना अभिमानास्पद असाच आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस (Sachin & Waqar doing commentary together for India vs Pakistan match in World Cup) हे सामन्यावेळी समालोचन करताना दिसून आले. रवी शास्त्री यांच्यासोबत समालोचन करताना दोघेही दिसून आले. 

तब्बल 34 वर्षांनी आपापल्या संघाला एकत्र चिअर 

तब्बल 34 वर्षांनी दोन्ही खेळाडू दोन्ही आपापल्या संघाला चिअर करताना दिसून आले. इतकेच नव्हे तर 1989 मध्ये सचिन तेंडुलकर सोळा वर्षे होता तेव्हा पाकिस्तानविरुद्ध कसोटीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पदार्पण केलं होतं. त्यानंतर  क्रिकेटची दंतकथा होऊन गेला. वकारने सुद्धा पाकिस्तानसाठी दमदार कामगिरी करत देशाचे प्रतिनिधित्व केलं. दोघांची कामगिरी त्यांच्या दोन्ही देशांसाठी तितकीच अभिमानास्पद राहिली असली, तरी क्रिकेटचा देव म्हणून सचिनचा होणारा उल्लेख किंवा त्याची आजवरची खेळी ही वादातीत राहिली आहे. आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानची धुलाई केली. वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानविरुद्ध त्याची कामगिरी दमदार राहिली. 

गॉड ऑफ क्रिकेटसोबत किंग कोहलीची चर्चा 

तत्पूर्वी सचिन तेंडुलकर विराट कोहलीशी सुद्धा मैदानात चर्चा करताना दिसून आला. गॉड ऑफ क्रिकेटसोबत किंग कोहली चर्चा करत असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली. दोन दिग्गजांनी बराच वेळ मैदानात चर्चा केली. सामना सुरू होण्यापूर्वी आणखी एक प्रसंग घडला. सचिन तेंडुलकर मैदानात वर्ल्डकपमध्ये उतरल्यानंतरही चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे हा सगळा सामना लाखो प्रेषकांसाठी संस्मरणीय ठरेल अशाच पद्धतीने होत आहे. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी बॉलीवूड गायकांनी गायनाचा कार्यक्रम करत वातावरण पूर्णतः बदलून टाकले. अरजित सिंग, सुखविंदर सिंग, सुनीदी चौहान, शंकर महादेवने यांनी सुरेल संगीतमय कार्यक्रम करत मैदानात भारावून सोडले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget