Gautam Gambhir on Mayanti Langer : विषय 'तो' निघाला आणि याचा जळफळाट थांबेना! 'अँग्री यंग मॅन' गौतम गंभीर थेट मयंती लँगरवर घसरला
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या शोदरम्यान विराट कोहली आणि त्याचा फॉर्म आणि आकडेवारी यावर चर्चा सुरू होती. याबाबत सातत्याने चर्चा होत होती. यानंतर कोहलीवरील चर्चा संपली आणि रोहितची चर्चा झाली.
Gautam Gambhir on Mayanti Langer : किंग विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांनीही या विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. कोहलीने टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून दिला होता. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध शानदार 87 धावा करत संघाच्या कामगिरीत मोठे योगदान दिले.
लखनऊच्या एकना स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्स शोमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील संभाषणाची गौतम गंभीरने खिल्ली उडवली. शोच्या होस्ट मयंती लँगरला गौतम गंभीरने असे काही सांगितले, जे ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल. एकना स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या शोदरम्यान विराट कोहली आणि त्याचा फॉर्म आणि आकडेवारी यावर चर्चा सुरू होती. याबाबत सातत्याने चर्चा होत होती. यानंतर कोहलीवरील चर्चा संपली आणि रोहित शर्माबद्दल चर्चा झाली, त्यानंतर गंभीर बोलला.
शेवटी तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहात..
गौतम गंभीरने मयंती लँगरसोबत विनोद केला. तो म्हणाला की शेवटी तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहात जो या विश्वचषकात अतिशय चमकदार कामगिरी करत आहे. गंभीरने हे फक्त गंमत म्हणून सांगितले होते. हे बोलण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही आणि सगळे हसायला लागले.
Gautam Gambhir said, "there is a difference between a captain and a leader. India have seen many captains, but Rohit Sharma is a leader, because he's selfless". (Star). pic.twitter.com/AuDH91nSMN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
लखनौमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीची बॅट अजिबात चालली नाही. तो 9 चेंडूत खाते न उघडता बाद झाल्याने पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली याआधी किवी संघाविरुद्ध ९५ धावा करण्यात यशस्वी ठरला होता, यावेळी काही वेगळे घडणार होते. मात्र, रोहित शर्माची बॅट इंग्लंडविरुद्ध जोरदार बोलली. तो 87 धावा करण्यात यशस्वी ठरला. रोहित शर्माने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम केले. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा सामना 100 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला, भारताचा हा सलग सहावा विजय ठरला.
Gautam Gambhir said, "Rohit Sharma would've got 40-45 hundreds by now, but he's not obsessed with hundreds. He's selfless". (Star Sports). pic.twitter.com/TmO1qF8WYO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
इतर महत्वाच्या बातम्या