England vs Australia : गुडघं टेकलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियानं नांगी टाकली!
स्टीव्हन स्मिथ आणि लॅबुशनगे यांनी अनुक्रमे 44 आणि 71 धावांच्या खेळीमुळे ऑस्टेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कॅमेरून ग्रीनने 47 धावांचे योगदा दिले, तर स्टाॅयनिस 35 धावांवर बाद झाला.
अहमदाबाद : वर्ल्डकप 2023 चा 36 वा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे होत आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार असूनही फलंदाजी ढेपाळली. स्टीव्हन स्मिथ आणि लॅबुशनगे यांनी अनुक्रमे 44 आणि 71 धावांच्या खेळीमुळे ऑस्टेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. कॅमेरून ग्रीनने 47 धावांचे योगदा दिले, तर स्टाॅयनिस 35 धावांवर बाद झाला. शेवटी अॅडम झम्पाने केलेल्या 29 धावांच्या छोटेखानी खेळीने ऑस्ट्रेलियाला पावणे तीनशेपर्यंत मजल मारता आली. झम्पा आणि पॅट कमिन्स नवव्या विकेटसाठी 38 धावा जोडल्याने 286 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून ख्रिस वाॅकेसने चार, तर मार्क वुड आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. डेव्हिड विलीला एक विकेट मिळाली.
दरम्यान, इंग्लंडचा संघ शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. इंग्लंड सध्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात. कांगारू संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 6 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना हा सामनाही जिंकावा लागेल.
इंग्लंडची अवस्था खूपच वाईट असून आतापर्यंत 6 सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यांना अजून 3 सामने खेळायचे आहेत. मात्र ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
जोस बटलर काय म्हणाला?
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला की, मला प्रथम गोलंदाजी करायची होती. तो म्हणाला की, ही खेळपट्टी पाहता सुरुवातीला खेळणे कठीण जाईल असे वाटते, पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी फलंदाजी सोपी होत जाईल. आम्हाला चांगली फलंदाजी करायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे नेहमीच चांगले असते. आम्ही आता आमचा हंगाम आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आमचे स्थान वाचवण्यासाठी खेळू. आम्ही आमच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स नाणेफेकीनंतर म्हणाला की, आम्हाला खरेतर फलंदाजी करायची होती, त्यामुळे नाणेफेक हरल्याने काही फरक पडला नाही. आमचे सलामीचे फलंदाज अप्रतिम दिसत आहेत. या सामन्यात (मार्कस) स्टॉइनिस आणि कॅमेरून ग्रीन यांच्या जागी मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक, कर्णधार), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
इतर महत्वाच्या बातम्या