एक्स्प्लोर
Advertisement
भारत पाकिस्तान सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? काय सांगितलंय इंग्लंडच्या हवामान विभागानं?
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा सामना आज (रविवारी) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मॅन्चेस्टरच्या मैदानावर एकमेकांशी भिडणार आहेत.
लंडन : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा सामना आज (रविवारी) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मॅन्चेस्टरच्या मैदानावर एकमेकांशी भिडणार आहेत. जगभरातील करोडो क्रिकेट फॅन्सची नजर या सामन्यावर आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
इंग्लंडमधील हवामान विभागाने मॅन्चेस्टरमध्ये आज पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. कालही (मॅन्चेस्टरमध्ये ) पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, भारताअगोदर मॅन्चेस्टरमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाला इनडोअर सराव करावा लागला आहे. भारतीय संघानेदेखील काल (शनिवारी)इनडोअर सराव केला. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आमचे संघ पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, मॅन्चेस्टरमध्ये शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसामुळे मैदानात पाणी साचले होते. अद्याप पावसाची स्थिती कायम आहे. या पावसामुळे भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण व्यक्त केली जात आहे.
भारत पाकिस्तान सामन्यातील दबावाबाबत माध्यमांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विचारले असता विराट म्हणाला की, आमच्या संघावर कोणताही दबाव नाही. संघातील सर्व खेळाडू सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आम्ही आजचा सामना पूर्ण ताकदीनिशी खेळू
विराट म्हणाला की, आमचा संघ उत्तम खेळला तर आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. त्यामुळे आम्ही कोणत्या संघाविरोधात खेळत आहोत, याची आम्हाला जरादेखील चिंता नसते. तसेच आमच्या संघाने सामन्यापूर्वीची सर्व सराव सत्र पूर्ण केली आहेत.
यंदाचा विश्वचषक पाण्यात खेळायचा का? | विश्वचषक माझा | ABP Majha
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली या दोघांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सौरव गांगुली म्हणाला की, पाकिस्तानसोबत खेळताता 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याप्रमाणे या सामन्यात कोणतीही चूक करु नका.
...म्हणून धोनीचा बलिदान बॅज आयसीसीला खटकला | माझा विशेष | ABP Majha
पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना फटका बसण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाचा विश्वचषकात एक-एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. रविवारचा सामनाही रद्द झाल्यास दोन्ही संघासाठी ही चिंतेची बाब असणार आहे. विश्वचषकातील भारताचा हा चौथा तर पाकिस्तानचा पाचवा सामना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement