एक्स्प्लोर
World Cup 2019 Final : इंग्लंड विश्वचषकाची कोंडी फोडणार?
27 वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. विश्वचषकाच्या 44 वर्षांच्या इतिहासात अंतिम फेरीत धडक मारण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. याआधी 1979, 1987, 1992 आणि आता 2019.
मुंबई : 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. विश्वचषकाच्या 44 वर्षांच्या इतिहासात अंतिम फेरीत धडक मारण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. याआधी 1979, 1987, 1992 आणि आता 2019. इंग्लंडला मागीस तिन्ही वेळा विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. पण यावेळी इंग्लंड लॉर्डसवर पहिल्यांदा विश्वचषक पटकावणार की नाही याचं उत्तर आपल्याला रविवारी रात्री मिळणार आहे. लंडनच्या लॉर्डसवर होणाऱ्या अंतिम फेरीत इंग्लंडसमोर आव्हान असेल ते केन विल्यम्सनच्या न्यूझीलंडचं.
यजमान इंग्लंडने साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यापासूनच यंदाच्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं होतं. त्यानंतर उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियालाही इंग्लंडने धूळ चारली. फलंदाजी हे इंग्लंडचं प्रमुख अस्त्र आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने विश्वचषकातल्या दहा सामन्यात 496, जेसन रॉयनं सात सामन्यात 426, तर ज्यो रुटने 10 सामन्यांत 549 धावांचा रतीब घातला आहे. इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांसह मधल्या फळीतल्या शिलेदारांनीही उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यात बेन स्टोक्सने दहा सामन्यांत 381 कर्णधार ऑइन मॉर्गनने 362 आणि जोस बटलरनं 253 धावा फटकावल्या आहेत.
फलंदाजांच्या या कामगिरीला इंग्लिश गोलंदाजांचीही यशस्वी साथ लाभली आहे. जोफ्रा आर्चरने इंग्लंडकडून सर्वाधिक 19 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. याशिवाय मार्क वूड, ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदनेही गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे पेलली आहे.
ज्या इंग्लंडमध्ये क्रिकेटचं बीज रुजलं त्याच इंग्लंडला एकही विश्वचषक जिंकता येऊ नये ही खरंतर शोकांतिका आहे. त्यामुळे तो कटू इतिहास पुसून नवा इतिहास घडवण्यासाठी ऑइन मॉर्गन आणि कंपनी सज्ज झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement