एक्स्प्लोर
डगआऊटमध्ये वॉकी-टॉकी वापरणाऱ्या कोहलीला आयसीसीकडून क्लीन चिट
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली डगआऊटमधून वॉकी-टॉकीवर बोलत असल्याचं दृश्य टीव्हीवर दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.
नवी दिल्ली : दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर काल (बुधवारी) खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 53 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सर्वांचं लक्ष आशिष नेहराच्या निवृत्तीकडेच होतं. मात्र, याचदरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली डगआऊटमधून वॉकी-टॉकीवर बोलत असल्याचं दिसून आलं.
टीव्हीवर हे दृश्य दाखवताच अनेकांनी त्याच्या या कृतीवर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. पण याप्रकरणी कोहलीला आयसीसीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
'मॅचदरम्यान वॉकी-टॉकीचा वापर हा टीम स्टाफ आणि ड्रेसिंग रुममध्ये संपर्कासाठी केला जातो. कोहलीनं आधीच भष्ट्राचारविरोधी पथकाची परवानगी घेऊन वॉकी-टॉकीचा वापर केला होता.' अशी माहिती आयसीसीच्या अधिकाऱ्यानं दिली.
कोहलीनं वॉकी-टॉकीचा वापर करुन आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. असं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. पण आयसीसीनं क्लिन चीट दिल्यानं कोहलीला दिलासा मिळाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार, ड्रेसिंग रुममध्ये मोबाइल फोनच्या वापरावर खेळाडूंना बंदी आहे. पण खेळाडू आणि स्टाफ वॉकी टॉकीचा वापर करु शकतात. संबंधित बातम्या :Kohli is using what looks like a walkie-talkie. Are cricketers allowed to use that during a match? #INDvNZ #T20 #FifteenthOver pic.twitter.com/4vu5wSYPaZ
— Pradeep P Bomble (@pradeeppb26) November 1, 2017
VIDEO : हवेत सूर मारुन पांड्यानं टिपला अप्रतिम झेल!
नेहराला शानदार निरोप, भारताची न्यूझीलंडवर 53 धावांनी मात
कारकीर्दीतील शेवटचा चेंडू आणि नेहरा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement