Afghanistan Cricket Team : भारताविरुद्धच्या मालिकेत अफगाण नेतृत्व इब्राहिम झद्रान करणार; राशिद खानचे पुनरागमन
Afghanistan Cricket Team : रहमानुल्ला गुरबाज आणि इक्रम अलीखिल या दोन यष्टीरक्षक फलंदाजांना भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात स्थान मिळाले आहे.
Afghanistan Cricket Team : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत इब्राहिम झद्रान अफगाण संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय राशिद खान आणि मोहम्मद नबी हे दिग्गज अफगाणिस्तान संघाचा भाग असतील. रहमानुल्ला गुरबाज आणि इक्रम अलीखिल या दोन यष्टीरक्षक फलंदाजांना भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात स्थान मिळाले आहे.
Afghanistan's squad for the T20i series against India. pic.twitter.com/6n2Zakgiei
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 6, 2024
या खेळाडूंना अफगाणिस्तान संघात स्थान मिळाले
अफगाणिस्तान संघाकडे कर्णधार इब्राहिम झद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज सलामीवीर असतील. याशिवाय इकराम अलीखिल आणि हजरतुल्ला झाझाई हे टॉप ऑर्डरमध्ये असतील. मधल्या फळीत रहमत शाह, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी आणि करीम जनात आहेत. तसेच अष्टपैलू अजमुल्ला उमरझाईला स्थान मिळवण्यात यश आले. राशिद खान आणि मुजीब उर रहमान फिरकीपटू विभागाचे नेतृत्व करतील. फाजल हक फारुकी, फरीद अहमद आणि नवीन उल हक हे वेगवान गोलंदाज असतील.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ
इब्राहिम झदरन (कर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.
मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. यानंतर 14 जानेवारीला दोन्ही संघ इंदूरमध्ये आमनेसामने येतील. त्यानंतर 17 जानेवारीला मालिकेतील तिसरा म्हणजेच शेवटचा सामना खेळवला जाईल. हा सामना बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. तसेच या मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील.
इतर महत्वाच्या बातम्या