एक्स्प्लोर
...तर आम्ही गेलला गमावून बसलो असतो!
किंग्स इलेव्हन पंजाबचा सहमालक नेस वाडियाने धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या लिलावाबाबत मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : किंग्स इलेव्हन पंजाबचा सहमालक नेस वाडियाने धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या लिलावाबाबत मोठा खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या गेलला पंजाबने अक्षरश: शेवटच्या क्षणी खरेदी केलं होतं. पण त्याचवेळी पंजाब गेलला गमावूनही बसलं असतं. कारण की, शेवटी त्यांच्याकडे फारच कमी पैसे शिल्लक होते.
आयपीएल लिलावादरम्यान अनपेक्षितरित्या गेलवर बोलीच लागली नव्हती. पण तिसऱ्या वेळेस किंग्स इलेव्हन पंजाबने त्याच्या दोन कोटी या बेस प्राईजमध्येच त्याला खरेदी केलं होतं. पंजाबचा हाच निर्णय आता त्यांच्या पथ्यावर पडत आहे.
याविषयी बोलताना वाडिया म्हणाला की, 'आमच्याकडे 2.1 कोटी रुपये शिल्लक होते. जर आम्ही सुरुवातीलाच गेलवर बोली लावली असती तर दुसरं कुणीतरी त्यापेक्षा जास्त बोली लावत गेलला खरेदी केलं असतं. पण आम्ही भाग्यवान ठरलो. कारण की, गेलवर बोली न लागल्याने आम्ही त्याला शेवटीच्या क्षणी बेस प्राईजमध्येच खरेदी करु शकलो.'
किंग्स इलेव्हन पंजाबने लिलावाआधी फक्त अक्षर पटेलला रिटेन केलं होतं. त्यानंतर पंजाबने नव्या संघासाठी बरेच पैसे खर्च केले होते आणि गेल हा त्यांचा शेवटचा खेळाडू होता.
गेलला दोन कोटीमध्ये खरेदी केल्यानंतर पंजाबकडे फक्त एक लाख रुपये शिल्लक राहिले. किंग्स इलेव्हनने आपल्या संघासाठी 67.5 कोटी रुपये खर्च केले आहेत.
लिलावाच्या दोन महिन्यानंतर गेलनं आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं. अवघ्या चार सामन्यात त्याने दोन अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement