Harry Brook Triple Hundred At Multan : पाकिस्तानमधील मुलतानला मिळाला नवा सुलतान! हॅरी ब्रुकचा त्रिशतकी तडाखा, तरीही सेहवागचा विक्रम अबाधित राहिला!
वीरेंद्र सेहवागनंतर कसोटीतील हे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे. सेहवागने याच मैदानावर 2004 मध्ये त्रिशतक ठोकले होते. सेहवागने चेन्नईत आफ्रिकेविरुद्ध कसोटी इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले होते.
Harry Brook Triple Hundred At Multan : पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत हॅरी ब्रूकने (Harry Brook Triple Hundred At Multan) त्रिशतक झळकावून इतिहास रचला. ब्रूकने 310 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. त्याने 28 चौकार आणि 3 षटकारांचा आतषबाजी केली. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर कसोटीतील हे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे. सेहवागने याच मैदानावर 2004 मध्ये त्रिशतक ठोकले होते. सेहवागने चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले होते. वीरूने अवघ्या 278 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले होते. आता या यादीत हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्रूकने मुलतानच्या मैदानात 310 चेंडूत हा पराक्रम केला.
TRIPLE HUNDRED FOR HARRY BROOK 🤯
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2024
302* from just 310 balls in Tests, the future of England batting doing the magic at Multan, he has batted Pakistan out of the Test match, one of the Crazy batting performances ever. 👊 pic.twitter.com/d5040XtLeN
पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा ब्रूक हा इंग्लंडचा पहिला फलंदाज
इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा ब्रूक हा सहावा फलंदाज ठरला. याआधी लेन हटन, वॅली हॅमंड, ग्रॅहम गूच, अँडी सँडहॅम आणि जॉन एडरिच यांनी इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतके झळकावली होती. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत त्रिशतक झळकावणारा ब्रूक हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला.
HARRY BROOK BECOMES THE FIRST ENGLAND PLAYER TO SCORE TRIPLE HUNDRED IN THIS CENTURY. 🙇🔥 pic.twitter.com/U435UiSbjg
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2024
कसोटीत सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)
278 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, 2008
310 चेंडू - हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024
362 चेंडू - मॅथ्यू हेडन विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ, 2003
364 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2004
381 चेंडू - करुण नायर विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2016
389 चेंडू - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पाकिस्तान, ॲडलेड, 2019
393 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध श्रीलंका, गॅले, 2010.
ब्रूक आणि रूट यांनी इंग्लंडसाठी सर्वात मोठी भागीदारी केली
मुलतान कसोटीत हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी इतिहास रचला आणि इंग्लंडसाठी सर्वात मोठी कसोटी भागीदारी करण्याचा विक्रम केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 454 धावांची (522 चेंडू) भागीदारी केली, जी इंग्लंडसाठी कसोटीतील सर्वात मोठी भागीदारी (रन्सच्या बाबतीत) होती. याआधी इंग्लंडसाठी कसोटीत सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम ग्रॅमी फॉलर आणि माइक गॅटिंगच्या नावावर होता, ज्यांनी 1957 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चौथ्या विकेटसाठी 411 धावांची भागीदारी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या