एक्स्प्लोर

Harjas Singh Triple Century In ODI: वनडे मॅचमध्ये ट्रिपल सेंच्युरी, 35 षट्कार लगावत 314 धावांचा डोंगर; ऑस्ट्रेलियाच्या हरजसची तुफानी खेळी

Harjas Singh Triple Century In ODI: 141 चेंडूंच्या या खेळीत हरजस सिंहनं  35 षटकारही ठोकले, ज्यात त्यानं तब्बल 210 धावांची खेळी केवळ षटकांच्या जोरावर रचली. 

Harjas Singh Triple Century In ODI: वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा धमाकेदार विक्रम सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे, त्यानं श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केलेल्या. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या हरजस सिंहनं 50 ओव्हर्सच्या सामन्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन शकतं झळकावून खळबळ उडवून दिली आहे. हरजसनं न्यू साउथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत 314 धावांची धमाकेदार खेळी खेळली. 141 चेंडूंच्या या खेळीत त्यानं  35 षटकारही ठोकले, ज्यात त्यानं तब्बल 210 धावांची खेळी केवळ षटकांच्या जोरावर रचली. 

फक्त 20 वर्षीय हरजस सिंहनं शनिवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात वेस्टर्न सबर्ब्सकडून खेळताना सिडनीविरुद्ध शानदार त्रिशतक झळकावलं. निकोलस कटलर आणि जोशुआ क्लार्क यांच्यात 70 धावांची भागीदार झाली. त्यानंतर हरजस सिंह तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. हरजस सिंहनं सुरुवातीला सावध फलंदाजी केली. तो मैदानावर आला, थोडासा स्थिरस्थावर झाला आणि त्यानंतर मात्र त्यानं दुसरीकडे कुठेच पाहिलं नाही. अक्षरशः गोलंदाजाच्या तोंडाला फेस येईपर्यंत हरजसनं मैदानावर षट्कार आणि चौकारांचा पाऊस पाडला. 

हरजस सिंहनं 33 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, त्याचा वेग काहीसा मंदावला पण, काही वेळातच स्वतःला सावरत त्यानं केवळ 74 चेंडूंमध्ये आपली शतकी खेळी पूर्ण केली. पण त्यानंतर, मात्र रुद्रावतार घेतल्याप्रमाणे हरजस येईल त्या गोलंदाजावर बरसताना दिसला. हरजसचं वादळ काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं. 

फक्त चौकार, षटकारांच्या जोरावर 258 धावा 

हरजस सिंहनं 314 धावांच्या खेळीत 35 षटकार आणि 12 चौकार मारलेत, त्यात 210 षटकार आणि 48 चौकारांचा समावेश होता. याचा अर्थ त्याने 258 धावा फक्त चौकारांच्या मदतीने केल्या. त्याने त्याचे पहिले शतक 74 चेंडू खेळले, परंतु त्याचे दुसरे शतक फक्त 29 चेंडूत आले. हरजसने 132 धावांवर आपले त्रिशतक पूर्ण केले, शेवटच्या षटकात 314 धावांवर बाद होण्यापूर्वी. हरजसच्या धमाकेदार खेळीमुळे वेस्टर्न सबर्ब्सने 483 धावांचा मोठा धावसंख्या उभारला.

हरजस सिंहनं ऑस्ट्रेलियासाठी खेळलाय अंडर 19 विश्वचषक

हरजस 2024 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता, त्यानं भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात 55 धावा केल्या. त्रिशतक झळकावल्यानंतर हरजस सिंह म्हणाला की, "मी फक्त शतक झळकावण्यात आनंदी होतो, कारण मी माझ्या आईला विचारलेलं , 'जर मी या सामन्यात शतक झळकावलं तर तू मला तुझी गाडी चालवू देशशील का?"

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 1

सर्वाधिक वैयक्तिक एकदिवसीय खेळीचा विक्रम अजूनही रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्यानं 13 नोव्हेंबर 2014 रोजी श्रीलंकेविरुद्ध 264 धावा केल्या. 173 चेंडू चाललेल्या या खेळीत रोहितनं 9 षटकार आणि 33 चौकार मारले. रोहित शर्मा आता फक्त वनडे खेळतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीसोबत त्याची संघात निवड झाली आहे. पण कर्णधार पदाची धुरा मात्र शुभमन गिलवरच देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'जबरदस्तीनं धर्मांतर...', पाकिस्तानी क्रिकेटपटूला हवंय भारतीय नागरिकत्व? म्हणाला, 'भारत मेरी मातृभूमी...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल

व्हिडीओ

Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mumbai Vileparle : विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
Ind Vs Nz 2nd T20 : 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
Embed widget