एक्स्प्लोर
युवराजचा सलग 6 षटकार मारण्याचा विक्रम मोडायचाय : हार्दिक पंड्या
बीसीसीआय डॉट टीव्हीच्या मुलाखतीत मजेशीर अंदाजात पंड्याने हा इच्छा व्यक्त केली.
गॉल : सिक्सर किंग युवराज सिंहचा सहा चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम मोडण्याची इच्छा टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने बोलून दाखवली आहे. बीसीसीआय डॉट टीव्हीच्या मुलाखतीत मजेशीर अंदाजात पंड्याने हा इच्छा व्यक्त केली.
अजून एका षटकात सहा षटकार मारण्याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. यापूर्वी तीन चेंडूत तीन षटकार ठोकले आहेत. मात्र चौथा षटकार ठोकला नाही. कारण त्याची गरज नव्हती. कधी सहा चेंडूत सहा षटकार मारण्याची परिस्थिती आली, तर त्या दिवशी मी तसं नक्की करीन, असं हार्दिक पंड्या म्हणाला.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत पंड्याने पदार्पणातच अर्धशतक ठोकलं. यावेळी आपण कसोटीत नव्हे, तर वन डेत खेळल्यासारखी फलंदाजी करत होतो, असं पंड्या म्हणाला.
पंड्याने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत 49 चेंडूत 50 धावा केल्या. याच धावांच्या बळावर भारताने 600 धावांचा टप्पा पूर्ण केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement