एक्स्प्लोर
जा देशासाठी आणि माझ्यासाठी पदक जिंकून ये: सुशीलकुमार

नवी दिल्ली: ऑलिम्पिकमध्ये भारताला दोनदा पदक मिळवून देणारा पैलवान सुशील कुमारने आज नरसिंह यादवच्या डोपिंगप्रकरणी नाडानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळविण्यासाठी 74 किलो वजनी गटातील सुशील आणि नरसिंहमध्ये मोठी कायदेशीर लढाईही झाली. ज्यामध्ये नरसिंहने कोटा स्थान पटकावलं होतं. त्यामुळे नरसिंहचं ऑलिम्पिक तिकीट पक्कं झालं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी सापडल्यानं या प्रकरणाला नवं वळणं मिळालं होतं. यानंतर त्याच्यावर तात्पुरती बंदीही घालण्यात आली होती. मात्र, आज नाडानं नरसिंहला बंदी हटवून मोठा दिलासा दिला.
नरसिंहला दिलासा मिळाल्यानंतर पैलवान सुशीलकुमारनं सोशल मीडियावरुन त्याला आपलं समर्थन दर्शवलं आहे. 'खूपच आनंदाची गोष्ट आहे. माझंही आधीही समर्थन होतं. आजही आहे आणि उद्याही राहिल. ज्या माझ्यासाठी आणि देशासाठी पदक जिंकून ये.' असं त्यानं ट्विट केलं. 'कुस्तीला या सर्व प्रकरणातून जावं लागलं हे फारच दुर्दैवी आहे. यासाठी मी माझं आयुष्य वेचलं आणि मी कायमच माझ्या सोबतीच्या पैलवानांच्या पाठीशी राहिलो आहे.' असंही ट्वीट सुशीलकुमारनं केलं आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नरसिंह यादव निर्दोष सिद्ध झाल्यानं आनंद व्यक्त केला आहे.बहुत ख़ुशी की बात है l मेरा सपोर्ट पहले भी था आज भी है और कल भी रहेगा l go win for me and the country #NarsinghYadav
— Sushil Kumar (@WrestlerSushil) August 1, 2016
We always knew that #NarsinghYadav was being victimised. Our stand is vindicated. Thank you Hon @narendramodi ji and @VijayGoelBJP ji! — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2016त्यांनीही नाडाच्या या निर्णयाचं स्वागतं केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
