एक्स्प्लोर

दमदार शतकाने गौतम गंभीर टीम इंडियाच्या उंबरठ्यावर

रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये त्याने पश्चिम बंगालविरुद्ध खेळताना शानदार 127 धावांची खेळी करत जुना सूर गवसला असल्याचे संकेत दिले.

पुणे : टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सलामीवीर गौतम गंभीरला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. पुण्यात खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये त्याने पश्चिम बंगालविरुद्ध खेळताना शानदार 127 धावांची खेळी करत जुना सूर गवसला असल्याचे संकेत दिले. नवदीप सैनी आणि कुलवंत खेजरोलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीने बंगालचा दुसरा डाव अवघ्या 86 धावांत गुंडाळत रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दिल्लीने तिसऱ्याच दिवशी बंगालचा एक डाव आणि 26 धावांनी पराभव केला. गंभीरने 216 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. या मोसमात त्याने पुन्हा एकदा जुन्या शैलीत फलंदाजी केली. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने 95 धावांची खेळी केली होती. शिवाय गेल्या महिन्यात कर्नाटकविरुद्ध 144 आणि त्यापूर्वीच्या सामन्यात 86 धावांची खेळी केली होती. गौतम गंभीर हा अशी क्षमता असणारा फलंदाज आहे, जो कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करु शकतो. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियात त्याचं पुनरागमन होईल, या अपेक्षा वाढल्या आहेत. आगामी काळात टीम इंडिया अनेक परदेशी दौऱ्यांवर जाणार आहे. त्यामुळे गंभीरचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. परदेश दौऱ्यांवर गंभीरने नेहमीच दमदार प्रदर्शन केलं आहे. गंभीरला टीम इंडियासाठी खेळण्याची अखेरची संधी 2016 मध्ये मिळाली होती, ज्यामध्ये त्याने एक अर्धशतक ठोकलं होतं. 2014 नंतर त्याला फारशी खेळण्याची संधी मिळालेली नाही. केवळ तीन कसोटी सामन्यातच त्याने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अखरेचा वन डे सामना त्याने 2013 साली खेळला होता. एक वेळ अशी होती, जेव्हा गंभीर भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाजांपैकी एक मानला जायचा. त्याने 2004 साली पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 2012 पर्यंत सलग त्याने कसोटी, वन डे आणि टी-20 हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. गंभीरने आतापर्यंत 58 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यामध्ये त्याच्या खात्यात 4 हजार 154 धावांचा समावेश आहे. यात 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. वन डेतही त्याने 40 च्या सरासरीने पाच हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो यशस्वी खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
IND vs ENG 1st ODI : बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Eng vs Ind 1st ODI Playing XI : रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget