एक्स्प्लोर

किंग्ज XI पंजाबतील मुंबईकर शार्दुल ठाकूरची संधी डावलली

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजे देशातील युवा खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ मानलं जातं. पण अनेक गुणवान खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधीही मिळत नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या बाबतीत तेच घडलं आहे.   24 वर्षीय शार्दुलनं खरं तर गेल्या काही मोसमात मुंबईकडून विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. यंदाच्या मोसमात त्यानं अकरा रणजी सामन्यांमध्ये 41 विकेट्स काढल्या होत्या. तसंच रणजी फायनलमध्ये आठ विकेट्स काढून मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांत इंग्लंडविरुद्ध 34 धावांत दोन आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 19 धावांत एक विकेट काढली होती.   त्याच्या मागोमाग आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळून टीम इंडियाचं दार ठोठावण्यासाठी शार्दुल उत्सुक होता. पण पंजाबनं शार्दुलला केवळ एकाच सामन्यात खेळवलं. आता तर शार्दुलला पंजाबनं सुटीच दिली आहे.   शार्दुलसह अरमान जाफर आणि प्रदीप साहूलाही पंजाबनं रिलीज केलं आहे. म्हणजेच हे तिघं उर्वरीत मोसमात एकही सामना खेळू शकणार नाहीत. शार्दूलची त्यामुळे निराशा झाली असली, तरी सरावाच्या निमित्ताने अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याचं त्यानं सांगितलं. दरम्यान, मुंबईच्या अखिल हेरवाडकरलाही दिल्ली डेअरडेव्हिल्सनं सुट्टी दिली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
Donald Trump on India: 'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
Jalgaon Crime News : जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ
जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
Donald Trump on India: 'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
'तुमचं डोकं गरगर फिरायला लागेल, असा टॅरिफ लावेन' मोदींना युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा सनसनाटी दावा
Jalgaon Crime News : जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ
जळगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात एकच खळबळ
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलनामुळे मृत्यूच्या तांडवात 31 जणांचा बळी; मृतांमध्ये बहुतांश भाविक, आकडा वाढण्याची भीती
Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताला दंडित करणार; तब्बल 50 टक्के टॅरिफची लागू, किती आणि कोणावर थेट परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प आजपासून भारताला दंडित करणार; तब्बल 50 टक्के टॅरिफची लागू, किती आणि कोणावर थेट परिणाम होणार?  
Virar Building Collapses Accident : लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
लेकीचा पहिलाच वाढदिवस अन् त्याच दिवशी काळानं घात केला; विरारच्या इमारत दुर्घटनेत चिमुरडीसह आईचा दुर्दैवी अंत
Manoj Jarange & Devendra Fadnavis: फडणवीस जाणूनबुजून अडथळे आणतायत, हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का? मनोज जरांगेंचा मोदी-शाहांना सवाल
फडणवीस जाणूनबुजून अडथळे आणतायत, हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का? मनोज जरांगेंचा मोदी-शाहांना सवाल
अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम
अनिल कपूर यांच्या लेकानं मुंबईत खरेदी केलं 5 कोटींचं आलिशान अपार्टमेंट; आतापर्यंत फक्त तीनच फिल्म्समध्ये केलंय काम
Embed widget