एक्स्प्लोर
Indian Cricket Team Sponsor 2025: कार बनवणाऱ्या जपानच्या कंपनीने दाखवला इंटरेस्ट, टीम इंडियाच्या जर्सीवर नाव झळकणार?
Indian Cricket Team Sponsor 2025: ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला.
Indian Cricket Team Sponsor 2025
1/7

ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर झाल्यानंतर काही दिवसांतच ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतचा प्रायोजकत्व करार संपवला.
2/7

ड्रीम 11 सोबत करार संपल्यानंतर आता बीसीसीआयकडून नवीन प्रायोजक शोधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
3/7

आशिया कप सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत.
4/7

आगामी काही दिवसांत टीम इंडियाच्या जर्सीवर नवीन प्रायोजकाचं नाव दिसेल. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
5/7

जपानमधील टोयोटा (Toyota) या ऑटोमोबाईल कंपनीने टीम इंडियासोबत प्रायोजकत्व करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
6/7

भारतात ही कंपनी टोयोटा किर्लोस्करने कार्यरत असून मागील आर्थिक वर्षात तिने 56,500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
7/7

नुकतीच टोयोटा इंग्लंड क्रिकेट संघाची टायटल स्पॉन्सर झाली होती, तर यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाशीही जोडली होती. त्यामुळे बीसीसीआय टोयोटाला प्रायोजक म्हणून संधी देणार की नाही, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.
Published at : 26 Aug 2025 09:57 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























