एक्स्प्लोर
Advertisement
श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप
आयसीसीने सनथ जयसूर्याला उत्तर देण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून 14 दिवसाची मुदत दिली आहे.
मुंबई : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सनथ जयसूर्यावर आयसीसी भ्रष्टाचारविरोधी नियमांअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. आयसीसीने त्याला 14 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आयसीसी प्रसिद्धी पत्रकही जारी केलं आहे.
जयसूर्याने आमच्या दोन नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्याच्यावर अनुच्छेद 2.4.6 अंतर्गत अँटी-करप्शन युनिटला सहकार्य न करणं आणि 2.4.7 अंतर्गत तपासात अडथळे आणल्याप्रकरणी आरोप लावल्याचं आयसीसीने म्हटलं आहे.
आयसीसीने सनथ जयसूर्याला उत्तर देण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून 14 दिवसाची मुदत दिली आहे. यादरम्यान जयसूर्यावरील आरोपांबाबत कोणतीही टिप्पणी करणार नाही, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.
श्रीलंकेला 1996 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सनथ जयसूर्याने 110 कसोटी सामन्यांमध्ये 6973 धावा केल्या आहेत. तर 445 वनडे सामन्यात त्याच्या नावावर 13430 धावांची नोंद आहे. श्रीलंका संघासाठी त्याने 31 ट्वेण्टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं असून त्यात 629 धावा केल्या आहेत. तर गोलंदाज म्हणून कसोटीत त्याच्या नावावर 98, वनडेमध्ये 323 आणि टी-20मध्ये 19 विकेट्सची नोंद आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement