Liverpool beat Manchester United : मँचेस्टर युनायटेडचा 90 वर्षांतील सर्वात मोठा पराभव, लिव्हरपुलनं 7-0 ने दिली मात
Football News : लिव्हरपुलकडून कोडी गॅकपो, डार्विन नुनेज आणि स्टार फुटबॉलर मोहम्मद सलाह यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
Liverpool beat Manchester United, Match Highlights : क्लब फुटबॉलमधील आघाडीचा संघ आणि इंग्लिश प्रिमीयर लीगमधील टॉपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव झाल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. इंग्लिश क्लब लिव्हरपुलने (Liverpool beat Manchester United) 7-0 अशा तगड्या फरकाने मँचेस्टर युनायटेडला मात दिली.
View this post on Instagram
लिव्हरपूलला एनफिल्ड ग्राऊंडमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी रविवारी रात्री करता आली. ब्राझीलियन स्टार फुटबॉलर रॉबर्टो फिरमिनो याने अखेरच्या काही मिनिटांत मैदानात येत 88 व्या मिनिटांला संघासाठी सातवा आणि वैयक्तिक पहिला गोल केला. याशिवाय लिव्हरपुलकडून कोडी गॅकपो, डार्विन नुनेज आणि स्टार फुटबॉलर मोहम्मद सलाह यांनी प्रत्येकी दोन गोल केले. ज्यामुळे 7-0 अशा मोठ्या फरकाने लिव्हरपुलने सामना जिंकला. या तगड्या विजयानंतर सर्व लिव्हरपुलच्या खेळाडूंसह चाहत्यांनी धिंगाणा केला. मोहम्मद सलाहने तर टी-शर्ट काढून जल्लोष केला.
पाहा VIDEO-
View this post on Instagram
एकेकाळी आघाडीचा क्लब असणारा लिव्हरपुल मधील काही वर्षे खास फॉर्मात नव्हता. पण मोहम्मद सालाह, फिरमिनो आणि सादियो माने या त्रिकुटाने प्रशिक्षक जर्गेन क्लॉपच्या नेतृत्वाखाली लिव्हरपूलला पुन्हा इंग्लिश आणि युरोपियन फुटबॉलमध्ये शीर्षस्थानी नेलं. पण यंदाच्या हंगामात त्यांची कामगिरी निराशाजनक असून सध्या लिव्हरपूल अद्याप प्रीमियर लीगमध्ये पाचव्या स्थानावर आहे. पण या दमदार विजयानंतर संघाचा आणि सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. दरम्यान या विजयानंतर प्रशिक्षक क्लॉप म्हणाला, "आम्ही आज दाखवलं की आपण काय असू शकतो, आपण काय करु शकतो आणि आतापासून आपल्याला काय करायचे आहे, आम्ही स्कोअरलाइनबद्दल बोलत नाही, आम्ही फक्त कामगिरीबद्दल बोलतो."
View this post on Instagram
हे देखील वाचा :