France vs Denmark: किलियन एम्बापेची दमदार कामगिरी; फ्रान्सचा डेन्मार्कवर 2-1 नं विजय
France vs Denmark: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) शनिवारी फ्रान्स आणि डेन्मार्क यांच्यात लढत झाली.
France vs Denmark: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) शनिवारी फ्रान्स आणि डेन्मार्क यांच्यात लढत झाली. या सामन्यात फ्रान्सनं डेन्मार्कचा 2-1 नं पराभव केला. हा सामना स्टेडियम 974 वर खेळला गेला. फ्रान्सच्या संघानं 61व्या मिनिटाला डेन्मार्कविरुद्ध आघाडी घेतली. फ्रान्सचा अनुभवी स्ट्रायकर कायलियन एम्बापेनं सामन्यातील पहिला गोल केला. थिओ हर्नांडेझच्या पासवर कायलियन एम्बापेनं (Kylian Mbappe) उत्कृष्ट गोल केला. किलियन एम्बापेनं त्याच्या 30व्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा 30वा गोल होता. फ्रान्सनं त्यांच्या गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4-1 नं पराभव केला होता. तर, डेन्मार्कचा सामना ट्युनिशियाविरुद्ध अनिर्णित राहिला.
ट्वीट-
Onto the next! France’s 2-1 win over Denmark moves them onto the round of 16.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 26, 2022
🎥 Watch the match highlights on FIFA+
ट्वीट-
Here's how things look in Group D after two games played!#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 26, 2022
केलियन एम्बापेचा पहिला गोल
या सामन्यात फ्रान्सकडून केलियन एम्बापेनं पहिला गोल केला. त्यानंतर अँड्रेस क्रिस्टेनसेननं डेन्मार्कसाठी पहिला गोल केला. त्यानं 68व्या मिनिटाला हा गोल केला. अशाप्रकारे डेन्मार्कनं सामन्यात बरोबरी साधली. यानंतर पुन्हा एकदा फ्रान्ससाठी 86व्या मिनिटाला किलियन एम्बापेनं गोल केला. या गोलनंतर फ्रान्स संघाने सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. त्याचवेळी, याआधी हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत.
डेन्मार्कचा संघ:
कॅस्पर श्मीचेल (कर्णधार, गोलकीपर), जोआकिम अँडरसन, अँड्रियास क्रिस्टेनसेन, व्हिक्टर नेल्सन, रॅस्मस क्रिस्टेनसेन, पियरे-एमिल होजब्जर्ग, ख्रिश्चन एरिक्सन, जोआकिम महले, जेस्पर लिंडस्ट्रॉम, अँड्रियास कॉर्नेलियस, मिकेल डॅम्सगार्ड
फ्रान्सचा संघ:
ह्यूगो लॉरिस (कर्णधार, गोलकीपर, ज्युल्स कोंडे, राफेल वराणे, डेओट उपमेकानो, थिओ हर्नांडेझ, ऑरेलियन चौमेनी, एड्रियन रॅबिओट, अँटोइन ग्रिजमन, ओस्माने डेम्बेले, ऑलिव्हियर गिरौड, किलियन एम्बापे.
हे देखील वाचा-