News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

Fifa World Cup 2022 : फ्रान्स की अर्जेंटिना कोणाला मिळणार 'वर्ल्ड कप 2022', आज होणार निर्णय, कधी, कुठे पाहाल सामना?

Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज फायनलचा सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना या संघामध्ये रंगणार असल्याने आज विश्वचषक विजेता संघ सर्वांसमोर येणार आहे.

FOLLOW US: 
Share:

Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) आज फायनलचा महामुकाबला खेळवला जाणार आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना (France vs Argentina) या दिग्गंज संघामध्ये ही लढत रंगणाॉर आहे. दोन्ही संघानी संपूर्ण स्पर्धेत कमाल कामगिरी करत फायनल गाठली आहे. दोन्ही संघात क्लासिक खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो. दरम्यान या हायवोल्टेज सामन्याच्या निकालातून कोणता संघ फिफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) उंचावणार हे समोर येणार आहे.

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलचा विचार केल्यास एकीकडे मेस्सीच्या अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले, तर दुसरीकडे फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट आपल्या नावे केले. दरम्यान आज फ्रान्स आणि अर्जेंटिना हे संघ जेतेपदाच्या लढतीसाठी एकमेकांशी भिडणार असून याआधी दोन्ही संघांनी 2-2 वेळा फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

कधी, कुठे पाहाल सामना?

आजचा फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना हा महामुकाबला भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

View this post on Instagram
 
A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)

फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना Head to Head

अर्जेंटिना आणि फ्रान्स विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोनदा अर्जेंटिना आणि एकदा फ्रान्सच्या संघाने बाजी मारली आहे. गेल्या विश्वचषकात हे दोन्ही संघ राऊंड ऑफ 16 च्या फेरीत भिडले होते, ज्यात फ्रान्सने रोमहर्षक लढतीत अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला होता.

हे देखील वाचा-

Published at : 18 Dec 2022 06:10 PM (IST) Tags: football Lionel Messi FIFA World Cup 2022 FIFA WC 2022 Qatar Tournament Football World Cup 2022 FIFA 2022 Fifa World Cup Final ARG vs FRA Argentina vs France Fifa Final

आणखी महत्वाच्या बातम्या

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा करताच विराट कोहलीची हृदयस्पर्शी कमेंट; सोशल मीडियावर वेगाने होतेय व्हायरल

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश

Lightning In Football Match : फुटबाॅल मॅच सुरु असताना थेट मैदानातील मध्यभागी वीज कोसळली; एक खेळाडू ठार, 7 गंभीर जखमी; 'फुटबाॅल पंढरी'त आक्रोश

India vs Qatar: फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

India vs Qatar:  फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरी: टीम इंडियाचा कतारकडून 0-3 पराभव

IND vs AUS: टीम इंडिया, द्रविड के लिए वर्ल्डकप जितो यार! 16 वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून हरला, आता प्रशिक्षक म्हणून विजयी निरोप मिळेल?

IND vs AUS: टीम इंडिया, द्रविड के लिए वर्ल्डकप जितो यार! 16 वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून हरला, आता प्रशिक्षक म्हणून विजयी निरोप मिळेल?

टॉप न्यूज़

Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका

Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका

लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत

लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत

Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त

Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त

मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष

मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष