Fifa World Cup 2022 : आज बलाढ्य इंग्लंडसमोर इराणचं आव्हान, पहिल्यांदाच दोघेही एकमेंकाविरुद्ध मैदानात
Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज बलाढ्य इंग्लंड संघासमोर इराणचा संघ असणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरतील.
Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) आज बलाढ्य इंग्लंड संघाचा सामना इराणशी (England vs Iran) होणार आहे. इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता इराणला आज विजयासाठी अतिशय उत्तम खेळ दाखवावा लागणार आहे. तर इंग्लंड संघ सध्या चांगला खेळ दाखवत असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसून येत आहे. विश्वचषक स्पर्धेचा विचार करता इंग्लंड 16 व्या वेळेस स्पर्धेत सहभागी होत असून सलग 7 व्यांदा ते स्पर्धेत असतील. तर इरण संघ 6 व्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. पात्रता फेरीतही इंग्लंडने अतिशय कमाल कामगिरी केली असून इराणने ठिकठाक कामगिरी करत विश्वचषकाचं तिकीट मिळवलं आहे. त्यात दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार असल्याने सामना पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
कोणत्या खेळाडूंवर असेल नजर?
इंग्लंड संघाचा विचार करता सर्वांच्या नजरा त्यांचा कर्णधार हॅरी केनवर असेल. त्याने पात्रता फेरीच्या सामन्यात तब्बल 12 गोल मारले आहेत. याशिवाय युवा फिल फोडेन यानेही बरेच असिस्ट केले आहेत. तर स्टर्लिंगवरही सर्वांच्या नजरा असतील. इराण संघात मेहदी तरेमी याने 5 गोल पात्रता फेरीत केल्याने तो त्यांचा महत्त्वाचा खेळाडू असेल. तर अली घोलीजादेह, होसेन कनान यांच्याकडूनही संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत.
कसा आहे आजवरचा इतिहास?
इंग्लंड आणि इराण यांच्यातील हा पहिला सामना असल्याने दोघांचा हेड टू हेड रेकॉर्ड नाही आहे. पण इराणने आजवर FIFA विश्वचषकात कोणत्याही युरोपियन संघाला मात दिलेली नाही. फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड दुसऱ्यांदाच आशियाई संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. याआधी 1982 च्या फिफा विश्वचषकात इंग्लंडने कुवेतचा 1-0 असा पराभव केला होता. ट्रेव्हर फ्रान्सिसने तेव्हा विजयी गोल केला होता.
कधी, कुठे पाहाल सामना?
आजचा हा इंग्लंड विरुद्ध इराण सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 मिनिटांनी सुरु होणरा आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
हे देखील वाचा-