Fifa World Cup 2022 : अंडरडॉग जपानचा संघ उपांत्यफेरी गाठणार का? गतवर्षीच्या उपविजेत्या क्रोएशियाचं आव्हान
Fifa WC 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज जपान आणि क्रोएशिया हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. जपानने यंदा सर्वांनाच चकित करत राऊंड ऑफ 16 फेरीपर्यंत मजल मारली आहे.
Fifa World Cup 2022 : कतार येथे सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) राऊंड ऑफ 16 मध्ये आज क्रोएशिया आणि जपान (Croatia vs Japan) यांच्यात सामना रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. एकीकडे जपानच्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये जर्मनी आणि स्पेन या तगड्या संघाचा पराभव केला. तर क्रोएशियानेही गट टप्प्यातील सामन्यात कॅनडाचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे एक अटीतटीचा सामना आज पाहायला मिळू शकतो.
यंदाच्या विश्वचषकात जपानने जर्मनी आणि स्पेनसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून मोठा उलटफेर दाखवला आहे. अशा स्थितीत जपान आपल्या या महत्त्वाच्या राऊंड ऑफ 16 च्या सामन्यात क्रोएशियाला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळून इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल. या विश्वचषकात जपानने चॅम्पियन संघ जर्मनीचा 2-1 असा पराभव करून सर्वांनाच थक्क केले. जपानने त्यानंतर स्पेनचाही 2-1 असा पराभव केला. त्यामुळे जपानने या विश्वचषकात आतापर्यंत ज्या प्रकारे खेळ केला आहे तो सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. अशा स्थितीत क्रोएशिया आणि जपान यांच्यातील आजचा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
कसा आहे आजवरचा इतिहास?
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात जपान आणि क्रोएशिया आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. यावेळी पहिला सामना 1998 मध्ये झाला होता ज्यात क्रोएशियाने जपानचा पराभव केला होता. त्याच वेळी, या दोन संघांमधील दुसरा सामना 2006 साली झाला, हा सामना अनिर्णित राहिला.
कधी, कुठे पाहाल सामना?
क्रोएशिया विरुद्ध जपान हा बाद फेरीचा सामना आज रात्री 8.30 वाजता अल जनुब स्टेडियम या ठिकाणी रंगणार आहे. भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
राऊंड ऑफ 16 च्या उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक:
सामना | संघ | तारीख | वेळ | ठिकाण |
Round of 16: Match- 5 | जपान विरुद्ध क्रोएशिया | 05 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | अल जनुब स्टेडियम |
Round of 16: Match- 6 | ब्राझील विरुद्ध कोरिया | 06 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | स्टेडियम 974 |
Round of 16: Match- 7 | स्पेन विरुद्ध मोरोक्को | 06 डिसेंबर 2022 | रात्री 8.30 वाजता | एज्युकेशन सिटी स्टेडियम |
Round of 16: Match- 8 | पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड | 07 डिसेंबर 2022 | मध्यरात्री 12.30 वाजता | लुसेल स्टेडियम |
हे देखील वाचा-