FIFA WC 2022 : नेदरलँड्स आणि इक्वेडोरमधील सामना 1-1 ने ड्रॉ, आधीच्या सामन्यात दोन्ही संघाचा विजय
Netherlands vs Ecuador FIFA WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्स आणि इक्वेडोरमधील मॅच 1-1 ने ड्रॉ झाली आहे. दोन्ही संघाने या आधीचा सामना जिंकला असून एक सामना ड्रॉ झाला आहे.
FIFA WC 2022 Qatar : फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 ( FIFA WC 2022 ) स्पर्धेतील सामन्यात नेदरलँड आणि इक्वेडोर ( Netherlands vs Ecuador ) यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत ड्रॉ झाला आहे. दोन्ही संघांसाठी हा चांगला निकाल आहे, कारण या आधीचा सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे, तर हा एक सामना अनिर्णित राहिला आहे. आता इक्वेडोरचा शेवटचा सामना सेनेगलशी होणार असून नेदरलँडचा शेवटचा सामना कतारविरुद्ध होणार आहे. सध्या ग्रुप A मध्ये नेदरलँड आणि इक्वेडोर दोन्ही संघ 4-4 पॉईंट्सह बरोबरीला आहेत.
सहा मिनिटांत नेदरलँडची आघाडी
नेदरलँड्सने सामन्याची धडाकेबाज सुरुवात केली आणि सहाव्या मिनिटाला आघाडी घेतली. कोडी गकपोने सलग दुसऱ्या सामन्यात गोल केला. यानंतर इक्वेडोरने वारंवार आक्रमी खेळी करत नेदरलँड्सला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आलं. एनर व्हॅलेन्सियाने 32 व्या मिनिटाला शानदार गोल करण्याचा प्रयत्न केला, पण हा गोल नेदरलँडच्या गोलरक्षकाने वाचवला. पूर्वार्धाच्या अतिरिक्त वेळेत इक्वेडोरने गोल केला, पण गोल बाद ठरवण्यात आला. पहिल्या उत्तरार्धानंतर नेदरलँड्स संघ 1-0 ने आघाडीवर होता.
Each team takes a point!@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 25, 2022
उत्तरार्धात इक्वेडोरने बरोबरी साधली
दुसऱ्या उत्तरार्धाच्या तिसऱ्या मिनिटाला इक्वेडोरचा गोल नेदरलँडच्या गोलरक्षकाने वाचवला, पण व्हॅलेन्सियाने रिबाऊंडवर गोल करत इक्वेडोरने सामना बरोबरीत आणला. यानंतरही व्हॅलेन्सियाने गोलसाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. दोन्ही संघांनी सातत्याने संधी निर्माण केल्या, पण तिसर्या अंतिम फेरीत कोणालाही यश मिळू शकलं नाही. नेदरलँड्सने स्कोअरलाइनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तर इक्वेडोरने सलग दुसरा गोल करण्याचा प्रयत्न केला.
सामन्याच्या शेवटच्या क्षणी इक्वेडोरचा कर्णधार व्हॅलेन्सिया दुखापतग्रस्त झाल्याने मैदानाबाहेर गेला. सामन्याचा नियमित वेळ संपल्यानंतर सहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत इक्वेडोरने बहुतांश वेळ चेंडूवर ताबा ठेवला, मात्र त्यांना गोल करता आला नाही आणि सामना 1-1 ने अनिर्णित राहिला.
कुठे पाहाल सामना?
भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क Viacom-18 कडे आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio Cinema वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.