(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA WC 2022 Qatar : फिफामधील धक्कादायक निकालांचं सत्र कायम, जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय
Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी अर्जेंटिनावर सौदी अरेबियाने विजय मिळवल्यानंतर आज जपानने जर्मनीला नमवत एक मोठा उलटफेर केला आहे.
Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa WC) मंगळवारनंचर आजही एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. फीफा रँकिंगमध्ये 11 व्या स्थानी असणाऱ्या जर्मनीला 24 व्या स्थानावरील जपान संघाने 2-1 ने मात दिली आहे. विशेष म्हणजे 74 मिनिटांपर्यंत जर्मनीचा संघ 1-0 ने आघाडीवर होता पण 75 आणि लगेचच 83 व्या मिनिटाला जपानने गोल करत एका रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे.
विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाला ज्याप्रकारे सौदी अरेबियाने 2-1 ने मात दिली, तसाच काहीसा सामना आज पाहायला मिळाला. त्या अर्जेटिंनाप्रमाणे जर्मनीनेही हाल्फ टाईमपूर्वी पेनल्टीच्या मदतीनं गोल केला होता. तर हाल्फ टाईमनंतर सौदीप्रमाणं जपाननं दोन गोल करत विजय मिळवला. सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी जर्मनीचा यंदाचा स्कॉड पाहता ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं. त्यांनी सुरुवातीपासून चांगली पकड बनवली होती. सामन्यात तब्बल 74 टक्के पजेशनजर्मनीकडे होतं. तर 26 टक्के पजेशनच्या जोरावर जपाननं दोन गोल करत सामनाही जिंकला. जर्मनीकडून ilkay gundogan यानं 33 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीनं पहिला गोल केला.
ज्यानंतर हाल्फ टाईमपर्यंत दोन्ही संघानी एकही गोल केला नाही. हाल्फ टाईमनंतरही दोन्ही संघाकडून प्रयत्न होत होते पण ते गोलमध्ये बदलत नव्हते. 74 मिनिटं झाली तरी 1-0 स्कोर असल्याने जर्मनी जिंकणार असंच वाटत होतं. पण 75 व्या मिनिटाला ritsu doan याने जपानसाठी पहिला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. ज्यानंतर मात्र जपाननं जोरदार आक्रमणं सुरु केली आणि 83 व्या मिनिटाला जपानच्या takumi minamino याने गोल करत जपानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर 90 मिनिटं होऊन अतिरिक्त वेळेतही जर्मनी गोल करु शकली नाही आणि सामना जपाननं 2-1 नं जिंकला.
View this post on Instagram
हे देखील वाचा-