एक्स्प्लोर

FIFA ची मोठी कारवाई; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन

Fifa Suspend AIFF: आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Fifa Suspend AIFF: फिफाने (International Federation of Association Football) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. फिफाने भारतीय फुटबॉल फेडरेशनला तात्काळ प्रभावाने निलंबित (Fifa Suspend AIFF) केले आहे. त्याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले आहे. तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली आहे. 

फिफाने दिलेल्या माहितीनुसार,  फिफाच्या कार्यकारणीने सर्वसंमतीने भारतीय फुटबॉल फेडरेशनला 'अनुचित हस्तक्षेप' मुद्यावर निलंबित करण्याचा निर्णय घेतला. फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. 

फिफाने म्हटले की, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.

फिफाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरून निलंबन करण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर फिफाने निलंबनाचा इशारा दिला. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या 28 ऑगस्ट रोजी निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी 17 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने फिफाने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यावर वक्तव्य केले होते. फिफाचा इशारा फारसा गांभीर्याने न घेण्याचे छेत्रीने म्हटले होते. फिफाच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता खेळाडूंनी आपल्या खेळाकडे लक्ष द्यावे असे छेत्रीने म्हटले असल्याचे वृत्त होते. 

फिफा काय आहे?

International Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Ind Squad vs SL T20I Series : 95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
95 षटकार, 91 चौकार अन् 498 चेंडू, 1089 धावा! संपूर्ण जगाला वेड लावणारा वैभव सूर्यवंशी आता श्रीलंकेविरुद्ध अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, कधी होणार संघाची घोषणा?
IND vs NZ 2nd Test : LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! पहिल्या डावात 5 विकेट्स घेणारा आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
LIVE सामन्यात टीम इंडियाच्या Playing XI मध्ये चक्रावून टाकणारा बदल! आकाशदीप OUT, बीसीसीआयकडून रिप्लेसमेंटची घोषणा, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 2nd Test : संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
संपूर्ण संघ ढेपाळला, एकट्या जुरेलने किल्ला लढवला! पण एक चूक अन् थोडक्यात शतकाचं स्वप्न भंगलं, भारतीय डाव 246 धावांत आटोपला; न्यूझीलंडकडे तगडी आघाडी
Nicholas Pooran : आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
आधी 13 चेंडूंत फक्त 3 धावा, अन् मग जे घडलं ते पाहून सगळे चक्रावले! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत निकोलस पूरनने MI ला जिंकवलं, सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: महागाईचा भडका! कांद्याच्या किंमतीत तब्बल 98.36 वाढ; साखर, तूरडाळ आणि खाद्यतेलाचे दरही गगनाला
Maharashtra Live blog updates: महागाईचा भडका! कांद्याच्या किंमतीत तब्बल 98.36 वाढ; साखर, तूरडाळ आणि खाद्यतेलाचे दरही गगनाला
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Embed widget