एक्स्प्लोर
Advertisement
FIFA 2018 : फ्रान्स की बेल्जियम, फायनलमध्ये कोण धडकणार?
फ्रान्स आणि बेल्जियम हे या विश्वचषकातले तुल्यबळ संघ असून या दोन्ही संघांना यंदा विश्वचषकासाठी पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून फायनलमध्ये कोण धडक मारणार, याविषयी फुटबॉलरसिकांमध्ये उत्सुकता आहे.
सेंट पीटर्सबर्ग : फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतला पहिला मुकाबला आज रात्री साडेअकरा वाजता खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ह्यूगो लॉरिसच्या बलाढ्य फ्रान्सची गाठ एडन हॅझार्डच्या बेल्जियमशी पडणार आहे. फ्रान्स आणि बेल्जियम हे या विश्वचषकातले तुल्यबळ संघ असून या दोन्ही संघांना यंदा विश्वचषकासाठी पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून फायनलमध्ये कोण धडक मारणार, याविषयी फुटबॉलरसिकांमध्ये उत्सुकता आहे.
विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सनं उरुग्वेचा तर बेल्जियमनं ब्राझिलचा पराभव करत उपांत्य फेरत धडक मारली होती. त्यामुळे आता हे दोन्ही तुल्यबळ संघ अंतिम फेरीच्या तिकीटासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
फ्रान्स
यंदाच्या विश्वचषकात फ्रान्सचा संघ सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. साखळी फेरीत अ गटात अव्वल स्थान गाठत फ्रान्सनं बाद फेरीत प्रवेश केला. त्यानंतर बाद फेरीतले दोन्ही सामने जिंकत 2006 नंतर पहिल्यांदाच फ्रान्सचा संघ उपांत्य फेरीत दाखल झालाय.
यंदाच्या विश्वचषकातील फ्रान्स प्रवास -
- पहिला सामना - फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी मात
- दुसरा सामना - फ्रान्सचा पेरुवर 1-0 असा विजय
- तिसरा सामना - फ्रान्सचा डेन्मार्कविरुद्धचा सामना बरोबरीत
- पहिला सामना - बेल्जियमची पनामावर 3-0 अशी मात
- दुसरा सामना - बेल्जियमकडून ट्युनिशियाचा 5-2 असा फडशा
- तिसरा सामना - बलाढ्य इंग्लंडवर 1-0 असा विजय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement