एक्स्प्लोर

भारताच्या पोरी इतिहास रचणार! FIDE बुद्धिबळ वर्ल्ड कप फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आमने-सामने, विजेत्याला मिळणार इतके पैसे

भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण आला आहे की, FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये (FIDE Women’s World Cup 2025) विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झाले आहे.

Koneru Humpy vs Divya Deshmukh FIDE Women’s World Cup 2025 Final : भारताच्या बुद्धिबळ इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण आला आहे की, FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकमध्ये (FIDE Women’s World Cup 2025) विजेतेपद भारतालाच मिळणार हे निश्चित झाले आहे. कारण अंतिम फेरीत दोनही खेळाडू भारतीय आहेत, अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि युवा प्रतिभा दिव्या देशमुख.

ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने केली कमाल

गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पीने चीनच्या टिंगजी लेई हिला टायब्रेकमध्ये पराभूत केलं. सामन्याच्या सुरुवातीच्या दोन डावांमध्ये दोघींनीही ड्रॉ खेळले. त्यानंतर टायब्रेकच्या 15-15 मिनिटांच्या डावांमध्ये देखील 1-1 अशी बरोबरी झाली. 10-10 मिनिटांच्या पुढील डावांमध्ये लेईने पहिला डाव जिंकून आघाडी घेतली, पण हम्पीने दुसरा डाव जिंकून सामना पुन्हा बरोबरीत आणला. नंतरच्या टायब्रेक सेटमध्ये हम्पीने पहिल्याच डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला. त्यानंतर फक्त एक ड्रॉ पुरेसा होता, पण हम्पीने तो डावही जिंकून थेट अंतिम फेरी गाठली.

दिव्या देशमुखची धमाकेदार कामगिरी

दुसरीकडे, बुधवारी दिव्या देशमुखने माजी विश्वविजेती चीनच्या झोंगयी टॅन हिला 1.5-0.5 अशा फरकाने हरवून फाईनलमध्ये प्रवेश केला. या ऐतिहासिक अंतिम फेरीमुळे भारताला पहिल्यांदाच FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती मिळणार हे निश्चित झालं आहे. आता सगळ्यांचं लक्ष आहे की, ही ट्रॉफी अनुभवी हम्पी जिंकेल की तरुण दमदार दिव्या देशमुख इतिहास घडवेल.

महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी देखील पात्रता

या दोघी भारतीय खेळाडूंनी आता पुढील वर्षी होणाऱ्या महिला कँडिडेट्स टूर्नामेंटसाठीही आपली जागा निश्चित केली आहे.

विजेत्याला 41.6 लाखांचे पारितोषिक!

FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025 चा अंतिम सामना भारताच्या दोन खेळाडूंमध्ये होणार असून, कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात ही ऐतिहासिक लढत रंगणार आहे. हा अंतिम सामना शनिवार, 26 जुलै रोजी सुरू होईल. पहिला डाव - 26 जुलै (शनिवार) आणि दुसरा डाव - 27 जुलै (रविवार) रोजी असले, आणि जर टायब्रेक्स झाला तर 28 जुलै (सोमवार) रोजी खेळवले जातील.

विजेत्या खेळाडूला $50,000 (सुमारे ₹41.6 लाख रुपये) मिळतील.

उपविजेत्याला $35,000 (सुमारे ₹29.1 लाख रुपये) दिले जातील.

हे ही वाचा -

Hulk Hogan Death News : WWE चा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने हल्क होगन यांचे निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget