(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harry Kane: हॅरी केन खास विक्रम; एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू, सर्जियो एग्वेरोला टाकलं मागं
English Premier League: इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL) रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टॉटेनहॅमचा स्ट्रायकर (Tottenham Striker) हॅरी केननं (Harry Kane) खास विक्रमाला गवसणी घातलीय.
English Premier League: इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL) रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात टॉटेनहॅमचा स्ट्रायकर (Tottenham Striker) हॅरी केननं (Harry Kane) खास विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं एका क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम केलाय. वुल्व्हविरुद्ध (Wolves) सामन्यात गोल त्यानं निर्णयाक गोल केला. ज्यामुळं त्याच्या गोलांची एकूण संख्या 185 वर पोहचली. हॅरी केननं हे सर्व गोल टोटेनहॅम हॉटस्परकडून खेळताना केले. अशा स्थितीत तो इंग्लिश प्रीमियर लीगच्या इतिहासात एका क्लबसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
हॅरी केनआधी अर्जेंटिनाचा स्ट्रायकर सर्जियो एग्वेरोच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला होता. मँचेस्टर सिटीसाठी सर्जियो एग्वेरोनं 184 गोल केले आहेत. मात्र, आता हॅरी केन 185 वा गोल करत सर्जियो एग्वेरोला मागं टाकलंय. याबाबत टोटेनहॅम क्लबनंही सोशल मीडियावर शेअर
ट्वीट-
मॅचवीक 3: टोटेनहॅम लीग टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर
टोटेनहॅमनं शनिवारच्या सामन्यात वुल्व्ह्सविरुद्ध 1-0 असा विजय नोंदवला. हॅरी केननं 64व्या मिनिटाला आपल्या क्लबसाठी निर्णायक गोल केला. यासह टॉटनहॅम आता लीग टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लीग टेबलमध्ये आर्सेनल पहिल्या क्रमांकावर आहे. आर्सेनलनं शनिवारी बोर्नमाउथचा 3-0 असा पराभव केला. या हंगामात आर्सेनलनं आतपर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात विजय मिळवलाय. शनिवारी झालेल्या अन्य लढतींमध्ये क्रिस्टल पॅलेसने अॅस्टन व्हिलाचा 3-1, फुलहॅमने ब्रेंटफोर्डचा 3-2 आणि साउथॅम्प्टनने लीसेस्टर सिटीचा 2-1 असा पराभव केला. एव्हर्टन आणि नॉटिंगहॅम यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.
हे देखील वाचा-