एक्स्प्लोर
Advertisement
भारताचा दारुण पराभव, वन डे मालिकाही गमावली
इंग्लंडने वन डे सामन्यांची मालिका जिंकून तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.
लंडन : इयॉन मॉर्गनच्या इंग्लंडने टीम इंडियाचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. इंग्लंडने वन डे सामन्यांची मालिका जिंकून तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली.
लीड्सच्या तिसऱ्या वन डेत भारताने इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. इंग्लंडने पहिल्या 10 षटकांतच दोन बाद 78 धावांची मजल मारून आपले इरादे स्पष्ट केले. मग ज्यो रूट आणि इयॉन मॉर्गनने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचली आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
ज्यो रुटने नाबाद 100 धावांची, तर मॉर्गनने 88 धावांची खेळी उभारली. विजयासाठी एका धावाची गरज होती आणि रुटला शतकासाठी चार धावांची. रुटने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं.
त्याआधी, या सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड विली आणि आदिल रशिदने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेऊन भारताला आठ बाद 256 धावांत रोखलं होतं. या सामन्यात सलामीचा रोहित शर्मा अवघ्या दोन धावांवर माघारी परतला होता. पण विराट कोहलीने शिखर धवनच्या साथीने 71 धावांची भागीदारी रचून भारतीय डाव सावरला.
त्यानंतर भारतीय डावाला भक्कम करणारी मोठी भागीदारीच झाली नाही. तरीही विराट कोहलीच्या 71, शिखर धवनच्या 44 आणि महेंद्रसिंग धोनीच्या 42 धावांच्या खेळीने भारताला आठ बाद 256 धावांचा टप्पा गाठून दिला. शेवटी आलेल्या शार्दूल ठाकूरनेही मोलाच्या नाबाद 22 धावा केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement