एक्स्प्लोर
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन विवाहबंधनात
इंग्लंडमधील सॉमरसेटमध्ये असलेल्या ऐतिहासिक बॅबिंग्टन हाऊसमध्ये इयॉन आणि तारा यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या.

मुंबई : इंग्लंडचा वनडे कर्णधार इयॉन मॉर्गन शनिवारी विवाहबंधनात अडकला. गर्लफ्रेण्ड तारा रिजवेसोबत त्याने लगीनगाठ बांधली. गेल्या आठ वर्षांपासून इयॉन आणि तारा डेटिंग करत होते. इंग्लंडमधील सॉमरसेटमध्ये असलेल्या ऐतिहासिक बॅबिंग्टन हाऊसमध्ये इयॉन आणि तारा यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम, नुकतीच निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू अॅलिस्टर कूक, जेसन रॉय, बटलर विवाह सोहळ्याला उपस्थित होते. इयॉनची पत्नी तारा ही 'बरबेरी' या लंडनमधील फॅशन हाऊसमध्ये मार्केटिंग को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. दोघं पहिल्यांदा 2010 साली भेटले होते. त्यावेळी मॉर्गन ऑस्ट्रेलियासोबत अॅशेस मालिका खेळणाऱ्या इंग्लंड टीमचा भाग होता. मॉर्गनने 16 कसोटी, 212 वनडे आणि 77 टी20 सामन्यांमध्ये इंग्लंडचं नेतृत्व केलं आहे. 2019 वनडे विश्वचषकात मॉर्गन इंग्लंडचं कर्णधारपद भूषवणार आहे.
आणखी वाचा























