England vs Australia : विश्वविजेत्या साहेबांचा ऑस्ट्रेलियाने सपशेल बाजार उठवला; इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर
ICC Cricket World Cup 2023 : इंग्लंड संघ 287 धावांचे लक्ष्य गाठून आज दुसरा विजय मिळवेल असे वाटत होते, मात्र स्पर्धेतील सातव्या सामन्यात त्यांना सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
England have been knocked out ICC Cricket World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने आपली परंपरा कायम ठेवली आणि आणखी एक सामना गमावला. यावेळी इंग्रजांचा ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी पराभव झाला. बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा हा सलग पाचवा पराभव होता. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या आणि मलानने 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या, ज्यामुळे संघाला कोणत्याही प्रकारे मदत होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने ३ बळी घेतले. झम्पाने फलंदाजी करताना 29 धावा केल्या होत्या. तोच सामन्याचा मानकरी ठरला.
Mitchell Starc said, "we expected England to come out a bit more aggressive, but they can take the moral victory from this". pic.twitter.com/ET7hLijcfn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला 49.3 षटकात 286 धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने 4 बळी घेतले. इंग्लंड संघ 287 धावांचे लक्ष्य गाठून आज दुसरा विजय मिळवेल असे वाटत होते, मात्र स्पर्धेतील सातव्या सामन्यात त्यांना सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर मार्कस स्टॉइनिसला 1 यश मिळाले.
England knocked out Australia from the 2019 World Cup.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
Australia knocked out England from the 2023 World Cup. pic.twitter.com/fN0zK6f2ml
इंग्लंडने सुरुवातीलाच लय गमावली
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला डावाच्या पहिल्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोच्या रूपाने झटका बसला, त्याला नव्या चेंडूसह आलेल्या मिचेल स्टार्कने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर पाचव्या षटकात संघाचा कणा म्हटला जाणारा जो रूट 13 धावा काढून बाद झाला. रुटलाही स्टार्कने झेलबाद केले.
मात्र, तिसऱ्या विकेटसाठी सलामीवीर डेव्हिड मलान आणि स्टार फलंदाज बेन स्टोक्स यांनी 84 धावांची (108 चेंडूत) भागीदारी केली, जी कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने 23व्या षटकात मलानला बाद करून मोडून काढली. मालन 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर काही वेळाने म्हणजेच 26व्या षटकात कर्णधार जोस बटलर केवळ 1 धाव घेत अॅडम झाम्पाचा बळी ठरला.
5TH CONSECUTIVE VICTORY IN THE 2023 WORLD CUP FOR AUSTRALIA...!!! pic.twitter.com/q9UnsAaFMz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
त्यानंतर मोईन अली आणि बेन स्टोक्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी ६३ धावांची (62 चेंडू) भागीदारी झाली, जी झम्पाने 36व्या षटकात चांगली खेळी करणाऱ्या स्टोक्सला बाद करून मोडून काढली. स्टोक्सने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडची पाचवी विकेट 169 धावांवर पडली.
ENGLAND KNOCKED OUT OF THE 2023 WORLD CUP...!!! pic.twitter.com/eRFmoRdc9h
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
त्यानंतर 37व्या षटकात मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला लियाम लिव्हिंगस्टोन 02 धावांवर होता, अर्धशतकाकडे वाटचाल करणारा मोईन अली 40व्या षटकात 42 धावांवर होता, डेव्हिड विली 15 धावांवर खेळत होता. 44व्या षटकात ख्रिस वोक्स 48व्या षटकात 32 धावांवर होता आणि 49व्या षटकात आदिल रशीद 20 धावांवर 10वी विकेट म्हणून बाद झाला.
इतर महत्वाच्या बातम्या