एक्स्प्लोर
खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंह आणि धावपटू द्युती चंद आऊट
भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंहचं खेलरत्न तर धावपटू द्युती चंदचं नाव अर्जुन पुरस्कारासाठीच्या यादीतून रद्द करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंहचं खेलरत्न तर धावपटू द्युती चंदचं नाव अर्जुन पुरस्कारासाठीच्या यादीतून रद्द करण्यात आले आहे. पंजाब राज्य शासनाकडून हरभजनची यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. तर ओदिशा सरकारने अर्जुन पुरस्कारासाठी द्युतीच्या नावाची शिफारस केली होती. परंतु या दोघांचा अर्ज दिलेल्या मुदतीत क्रीडा मंत्रालयाकडे दाखल न झाल्याने त्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही.
द्युतीनं गेल्या वर्षी एशियाडमध्ये दोन रौप्य तर यंदाच्या दोहा आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हरभजनने 711 बळी घेतले होते. यामध्ये कसोटीतल्या 417, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 आणि टी20 मधल्या 25 बळींचा समावेश आहे. आपआपल्या क्रीडा प्रकारातील योगदानाबद्दल या दोघांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.
Dutee Chand's nomination for Arjuna award, Harbhajan's for Khel Ratna rejected Read @ANI Story | https://t.co/kH9AfKaqQR pic.twitter.com/HGL8TnqXjG
— ANI Digital (@ani_digital) July 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement