एक्स्प्लोर

दुती चंदने इतिहास रचला, 100 मीटर शर्यतीच्या जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक

23 वर्षीय दुती चंदने इटलीतील ही 100 मीटर धावण्याची शर्यत 11.32 सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

नेपल्स : क्रिकेट विश्वचषकात भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्याने क्रीडाचाहते काहीसे दु:खी झाले. परंतु भारताची युवा धावपटू दुती चंदने जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून भारतीयांच्या दु:खावर फुंकर मारली. दुतीच्या या कामगिरीवर ट्विटर तसंच फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर तिची वाहवा होत आहे. खुद्द राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांनीही तिचं कौतुक केलं. धुती चंदचा विक्रम राष्ट्रीय विक्रम रचणारी दुती चंदने बुधवारी (10 जुलै) नवा विक्रम आपल्या नावावर जमा केला. इटलीत सुरु असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर शर्यत केवळ 11.32 सेकंदात पूर्ण करुन तिने सुवर्ण पदकाची कमाई केली. यासोबतच वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला धावपटू बनली आहे. स्वित्झर्लंड, जर्मनीच्या धावपटूंना मागे सोडलं 23 वर्षीय दुती चंदने इटलीतील ही 100 मीटर धावण्याची शर्यत 11.32 सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या प्रकारात स्वित्झर्लंडच्या डेल पाँटेने 11.33 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर जर्मनीच्या लिसा क्वेईने 11.39 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळवलं. दुती चंदने इतिहास रचला, 100 मीटर शर्यतीच्या जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारी दुसरी महिला धावपटू जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी दुती चंद ही हिमा दासनंतर दुसरी धावपटू आहे. हिमाने मागील वर्ल्ड ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर दुती चंजने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर शर्यतीत प्रत्येकी एक रौप्यपदक मिळवलं होतं. राष्ट्रपती, पंतप्रधान, क्रीडा मंत्र्यांकडून अभिनंदन दुती चंदच्या या कामगिरीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजिजू, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, उद्योजक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांनी तिचं अभिनंदन केलं. यानंतर दुतीनेही सगळ्यांचे आभार मानत रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट करत सुवर्ण पदक जिंकण्याचा प्रयत्न करेन, असं सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Embed widget