एक्स्प्लोर
Advertisement
भारत-पाकचे गट वेगळे करा, बीसीसीआयची आयसीसीकडे मागणी
मुंबई: उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले आहेत. दोन्ही देशांकडून सर्वच क्षेत्रातील संबंध कमी केले जात आहेत. आता याचे पडसाद क्रीडा क्षेत्रावरही दिसून येत आहेत. बीसीसीआयने आगामी आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने यासाठी आयसीसीकडे दोन्ही देशांना आगामी आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये एका गटामध्ये ठेऊ नये, अशी मागणी केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकुर म्हणाले की, ''भारत सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकटं पाडण्याची मोहीम अवलंबली आहे. शिवाय सध्या उरी हल्ल्याने देशावासियांमध्ये संतप्त भावना आहे. देशातील जनभावनेच्या भावनाचा विचार करुन आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटामध्ये ठेऊ नये, अशी मागणी आयसीसीकडे केली आहे.''
जर एखाद्या टूर्नामेंटमध्ये हे दोन्ही देश वेगवगळे खेळत असताना, उपांत्या लढतीत समोरासमोर ठाकले, तर ती परिस्थिती वेगळी असेल. असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी टूर्नामेंट ब्रिटेनमध्ये होणार आहे. या टूर्नामेंटला सात महिन्यांचा आवधी बाकी आहे. क्रिकेटप्रेमींची गर्दी खेचण्यासाठी हे दोन्ही संघ एका गटामधून खेळवले जातात. पण सध्या या दोन्ही देशातील संबंध तणावग्रस्त असल्याने बीसीसीआयने या टूर्नामेंटमध्ये आपल्यला वेगळ्या गटामध्ये ठेवावे, अशी मागणी आयसीसीकडे केली आहे.
संबंधित बातम्या
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...
भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने पाकिस्तानला लोळवलं
उरी घटना प्रचंड दु:ख देणारी: विराट कोहली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम
Advertisement