एक्स्प्लोर

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार?

नवी दिल्लीः भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात 11 जूनपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी धोनीच्या कर्णधारपदावरुन चर्चेला उधाण आलं आहे.  भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी नुकतच सर्व प्रकारच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या नावाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाला एक पराभव पत्करावा लागला तरी धोनीच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जातील, असं क्रिकेट तज्ञांचं म्हणणं आहे.   त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार का, या चर्चेने आता जोर धरला आहे. कारण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या करिअरमध्ये झिम्बाब्वे दौरा हा त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा दौरा ठरला होता. त्यावेळी देखील संघाच्या प्रशिक्षकांनी कर्णधार बदलण्याची शिफारस केली होती.   धोनी आणि आणि गांगुली यांच्यातील साम्य   सौरव गांगुली कर्णधार असताना संघाची परिस्थिती अशीच काहीशी होती. गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2005 मध्ये भारताने 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. पण भारताचे तत्कालिन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांचा ताळमेळ फारसा चांगला नव्हता. त्यामुळे चॅपेल यांनी गांगुलीला कर्णधारपद सोडून देण्याचा सल्ला दिला होता. गांगुलीने झिम्बाब्वे दौऱ्यात पहिल्याच सामन्यात शतक झळाकावून चॅपल यांना चांगलच उत्तर दिलं होतं. शिवाय दोन्ही मालिका आपल्या नावावर केल्या होत्या.   प्रशिक्षक चॅपेल यांनी भारतात परत आल्यानंतर बीसीसीआयला मेल करुन एक शिफारस केली, ज्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती. चॅपेल यांच्या शिफारशीनंतर गांगुलीला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आणि राहुल द्रविडकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती.   भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची सध्याची परिस्थिती देखील गांगुलीच्या झिम्बाब्वे दौऱ्याप्रमाणेच आहे. संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी ऐवजी विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार करण्याची मागणी केली आहे. शास्त्री यांनी धोनीला खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे.   धोनीने आगामी दौऱ्यात चांगलं प्रदर्शन न केल्यास बीसीसीआयला धोनीला कर्णधारपदावरुन दूर करण्यासाठी चांगलं कारण मिळू शकतं, असं क्रिकेट तज्ञांचं म्हणणं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget