CSK vs MI, Match Preview : चेन्नईविरुद्ध मुंबईचं पारडं जड, आज रंगणार लढत, कुठे आणि कधी पाहाल सामना
IPL 2021 2nd Half : आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान आजचा सामना रंगणार आहे.
IPL 2021 2nd Half : आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान आजचा सामना रंगणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा विजयी आरंभ करण्यास मुंबई इच्छुक आहे.
IPL 2021: आजपासून आयपीएलचा दुसरा टप्पा, प्रेक्षकांचीही उपस्थिती, आज मुंबई चेन्नईशी भिडणार
मुंबईचं पारडं जड
आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध चेन्नईची तुलना केली असता यात मुंबईचं पारडं जड असल्याचं स्पष्ट आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या 31 सामन्यांपैकी 19 सामने मुंबईनं जिंकले आहेत तर चेन्नईनं 12 सामने जिंकले आहेत. दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये मुंबईनं गेल्या आयपीएलची फायनल जिंकत किताब नावावर केला होता.
चेन्नईचा यंदाचा प्रवास चांगला
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. चेन्नई 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सात सामने खेळणार आहे. मुंबईनं आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकले आहेत. 8 अंकांसह मुंबई चौथ्या स्थानावर आहे. आता यंदाचा आयपीएल जिंकत मुंबई विजयी हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील सातपैकी चार सामने जिंकणं आवश्यक आहे.
In Pics : धोनीचा नाद खुळा फॅन... बाळाच्या सातव्या महिन्याचं भन्नाट सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
कुठे पाहाल सामना
आज चेन्नई आणि मुंबई दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या प्रसारणाचे सर्वाधिकार स्टार इंडिया नेटवर्ककडे आहेत. त्यामुळं चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना पाहू शकतील. विशेष म्हणजे स्टार इंडियाच्या चॅनल्सवरती आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण सामन्याचा आनंद घेऊ शकाल. मोबाईलवरही आपण हॉट स्टारच्या अॅपवर सामना पाहू शकाल.
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कूल्टर नाइल/जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम-
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, इमरान ताहिर/लुंगी एंगिडी