एक्स्प्लोर

IPL 2021: आजपासून आयपीएलचा दुसरा टप्पा, प्रेक्षकांचीही उपस्थिती, आज मुंबई चेन्नईशी भिडणार

IPL 2021 2nd Half : आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे. मागील टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे तर हैदराबाद तळाला आहे. 

IPL 2021 2nd Half : आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आजपासून होत आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान आजचा सामना रंगणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा विजयी आरंभ करण्यास मुंबई इच्छुक आहे.  मागील टप्प्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये आतापर्यंत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे तर हैदराबाद तळाला आहे.  4 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. 

Delhi Capitals: आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीनं शानदार प्रदर्शन केलं आहे. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये टॉप वर आहे. दिल्लीनं आतापर्यंत आठपैकी सहा सामने जिंकले आहेत. 

Chennai Super Kings: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. चेन्नई 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सात सामने खेळणार आहे.

IPL 2021 : आयपीएलच्या मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार! उद्यापासून तिकीट विक्री सुरु

RCB: विराट कोहलीच्या बंगळुरुनं आतापर्यंत पाच सामने जिंकले आहेत. 10  अंकांसह बंगळुरु तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीनं आतापर्यंत सातपैकी पाच सामने जिंकले आहेत. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नईदरम्यान उद्याचा सामना रंगणार आहे.  मुंबईनं आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकले आहेत. 8 अंकांसह मुंबई चौथ्या स्थानावर आहे. आता यंदाचा आयपीएल जिंकत मुंबई विजयी हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  मुंबईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील सातपैकी चार सामने जिंकणं आवश्यक आहे.  

Rajasthan Royals: संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या  राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. राजस्थाननं पहिल्य़ा टप्प्यात आपल्या सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.  

Punjab Kings: केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाब पॉइंट टेबलमध्ये सहाव्या नंबरवर आहे.  पहिल्या टप्प्यात पंजाबनं आठ पैकी तीन सामने जिंकले आहेत. पंजाबला प्ले ऑफमध्ये जायचं असेल तर उर्वरित सहापैकी  पाच सामने जिंकावे लागणार आहेत. 

KKR: कोलकाताचा संघ आयपीएल 2021 चांगली राहिलेली नाही. कोलकाता टीम पॉईंट टेबलमध्ये सातव्या नंबर वर आहे.   केकेआरनं पहिल्या टप्प्यातील सात सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले आहेत. 

SRH: हैदराबादनं आयपीएल 2021 मध्ये पहिल्या टप्प्यात खूपच निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. हैदराबाद आतापर्यंत पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. हैदराबादनं सात सामन्यांपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. 

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक  (IPL 2021 Second Phase Mumbai Indians Schedule) 

  • 19 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)
  • 20 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)
  • 21 सप्टेंबर -  पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)
  • 22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
  • 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)
  • 24 सप्टेंबर-  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)
  • 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)
  • सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)
  • 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स  (दुपारी 3.30)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स  ( सायं. 7.30)
  • 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)
  • 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)
  • मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज  ( सायं. 7.30 )
  • 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )
  • 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )
  • 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब   ( सायं. 7.30 )
  • 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)
  • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    ( सायं. 7.30)
  • 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज   (दुपारी 3.30)
  • कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
  • 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज  ( सायं. 7.30)
  • 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स   ( सायं. 7.30)
  • 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)
  • 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज  (दुपारी 3.30)
  • कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)
  • 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स  (दुपारी 3.30)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)
  • 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1
  • 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर
  • 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2
  • 15 ऑक्टोबर फायनल 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
Embed widget