(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cristiano Ronaldo Rape Case: ख्रिस्तियानो रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप; मॉडलकडून अमेरिकेच्या कोर्टात पुन्हा याचिका दाखल
Cristiano Ronaldo Rape Case Kathryn Mayorga: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Cristiano Ronaldo Rape Case Kathryn Mayorga: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 13 वर्षांपूर्वीच्या एका बलात्कार प्रकरणी ख्रिस्तियानो रोनाल्डो अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कैथरीन मायोर्गा (Kathryn Mayorga) नावाच्या एका मॉडेलनं ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध पुन्हा एकद अमेरिकेच्या न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोनं 2009 मध्ये वेगासच्या एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केलाय, असा आरोप कैथरीन मायोर्गानं केलाय.
ख्रिस्तीयानो रोनाल्डोनं अनेकदा कॅथरीन मायोर्गावर बलात्कार केल्याचा आरोप तिनं केला होता. त्यानंतर हे प्रकरण दिर्घकाळ न्यायालयात सुरू होतं. मात्र, काही काळानं अमेरिकेच्या एका न्यायालयानं रोनाल्डोची निर्दोष मुक्तता केली होती. परंतु,कैथरीन मायोर्गानं पुन्हा एकदा रोनाल्डोविरुद्ध अमेरिकेच्या न्यायालयात याचिका दाखल केलीय. तिनं बलात्काराचा आरोप करत रोनाल्डोकडून 375,000 डॉलर नुकसान भरपाईची मागणी केली होती.
कोर्टाच्या आदेशात काय म्हटलंय?
प्रसारमाध्यमात झळकत असलेल्या वृत्तानुसार, रोनाल्डोच्या प्रकारणात अमेरिका कोर्टाच्या न्यायाधीशांनी निकाल देताना आदेशात म्हटलं होतं की, "कॅथरीनच्या वकिलानं नियमांनुसार हा खटला लढलेला नाही. तक्रारी दाखल करण्याची प्रक्रियाही योग्य नाही. या कारणास्तव न्यायालयानं या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. कोर्टानं 2019 मध्ये सांगितले होतं की, रोनाल्डोवर गुन्हा दाखल करता येणार नाही, कारण त्यात फक्त संशय आहे."
पुढील सुनावणी कधी?
द सनच्या वृत्तानुसार, मॉडेल कॅथरीन मेयोर्गानं यावेळी पुन्हा याचिका दाखल केलीय. यामध्ये त्यांनी अमेरिकन कोर्ट ऑफ अपीलमध्ये बडतर्फीच्या कलमाखाली याचिका दाखल केलीय. या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्ट रोजी फोनद्वारे होणार आहे.
जगातील सर्वोकृष्ट फुटबॉलपटूंमध्ये रोनाल्डोचं नाव
जगातील सर्वोकृष्ट फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचं नाव जोडलं जातं. रोनाल्डोनं काहीच दिवसांपूर्वी त्याचा आधीचा क्लब मॅनचेस्टर युनायटेडच्या क्लबमध्ये एन्ट्री केलीय. याचदरम्यान, रोनाल्डोनं हा क्लबही सोडण्याचा निर्णय घेतला होता. चॅम्पियन लीगमध्ये तो नव्या क्लबकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. रोनाल्डोनं याच वर्षी मार्च महिन्यात महान फुटबॉलपटू जोसेफ बायकनचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता. जोसेफ बायकन यांच्या नावावर 806 आंतरराष्ट्रीय गोलची नोंद आहे.
हे देखील वाचा-
- बाबर आझमच्या नावावर चौथ्यांदा लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, संपूर्ण कारकिर्दीत विराटकडून एकदाही नाही घडलं!
- Asian Championship: मीराबाई चानू, जेरेमी लालरिननुंगा, अचिंता शेउली आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाहीत; कारण काय?