एक्स्प्लोर

India tour of Zimbabwe: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! झिम्बाब्वेनं सलग तीन मालिका जिंकून रचला इतिहास

India tour of Zimbabwe: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौरा करणार आहे.

India tour of Zimbabwe: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेला येत्या 18 ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आलीय. झिम्बाब्वेनं सलग तीन मालिका जिंकून इतिहास गवसणी घातलीय.

झिम्बाब्वेचा सलग तीन मालिकेत विजय
झिम्बाब्वेनं पहिल्यांदाच सलग तीन मालिका जिंकल्या आहेत. ज्यात दोन टी-20 आणि एका एकदिवसीय मालिकेचा समावेश आहे. झिम्बाब्वेनं प्रथम टी-20  वर्ल्डकप क्वालिफायर मालिका जिंकली होती. त्यानंतर बांग्लादेशला टी-20 आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका पराभूत केलंय. 

सिंकदर रजाचा जबरदस्त फॉर्म
या तिन्ही मालिकेत झिम्बाब्वेचा स्टार ऑलराऊंडर सिंकदर रजानं दमदार कामगिरी करून दाखवली. त्यानं टी-20 वर्ल्डकप क्वालिफायरच्या अंतिम सामन्यात नेदरलँडविरुद्ध 8 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर बांग्लदेशविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत त्यानं मालिकावीरचा खिताब जिंकला होता. बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेत 2 विकेट्स घेऊन 127 धावा केल्या. तर, एकदिवसीय मालिकेत पाच विकेट्स घेऊन 252 धावा केल्या. 

झिम्बाब्वेच्या अखेरच्या तीन मालिकेतील विजय
1) टी-20 क्वालिफायर फायनल- नेदरलँडला 37 धावांनी पराभूत केलं.
2) बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 नं विजय
3) बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 2-1 नं विजय

भारताचं झिम्बाब्वे दौऱ्यातील वेळापत्रक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात येत्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 22 ऑगस्ट 2022 रोजी खेळला जाईल. 

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

सहा वर्षानंतर भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा
दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बाब्वे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर एबीपी माझाDevendra Fadnavis Speech Nagpur | नागपूर विमानतळासाठी मोठा निधी, फडणवीसांनी दिली मोठी माहितीGulabarao Patil On Sanjay Raut : शिवसेना फोडण्यात संजय राऊतांचा'सिंहाचा वाटा'ABP Majha Headlines : दुपारी 06 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Rahul Gandhi : राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
राऊत म्हणाले, जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर, तृणमूल म्हणते, अहंकार नडला; राहुल गांधी मोजक्याच शब्दात काय म्हणाले?
Uddhav Thackeray: जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
जालन्यात ठाकरे गटाला मोठा धक्का! सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण बांधणार शिवबंधन, राजेश टोपे यांना देणार मोठं आव्हान
Embed widget