Shivam Mavi : पहिल्यांदाच शिवम मावीला मिळाली टीम इंडियात संधी, या युवा वेगवान गोलंदाजाचा काय आहे खास?
IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज शिवम मावीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Shivam Mavi Team India : बीसीसीआयच्या (BCCI) निवडकर्त्यांनी 27 डिसेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ 3 टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान हार्दिकच्या नेतृत्त्वााखाली टी20 संघात बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) यालाही प्रथमच भारताच्या T20 संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे जर अंतिम 11 मध्ये संधी मिळाल्यास मावी श्रीलंकेविरुद्ध टी20 कारकिर्दीची सुरुवात करू शकतो. तर मावीला संघात घेण्यामागी खास कारण म्हणजे मावी स्विंग बॉलिंग उत्तमरित्या करु शकतो. त्याला यावेळी आयपीएल लिलावात गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपयांना खरेदी देखील केले.
शिवम मावीची विशेष गोष्ट म्हणजे त्याची स्विंग गोलंदाजी आहे. ज्यावर तो बराच काळ काम करत आहे. अंडर-19 विश्वचषकात त्याने आपल्या स्विंग बॉलिंगने थैमान घातले होते. त्यानंतर आयपीएल 2018 च्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. तेव्हापासून तो केकेआर संघाचा भाग होता. पण आयपीएल 2023 च्या मिनी लिलावापूर्वी केकेआरने त्याला सोडले आणि आता गुजरातने 6 कोटी देत त्याला संघात घेतलं आहे. मावी हा मेरठचा आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार आणि सध्याचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे देखील मेरठचे आहेत. शिवम मावीही प्रवीण आणि भुवनेश्वरसारख्या स्विंग गोलंदाजीत तरबेज आहे. गोलंदाजी स्विंग करण्यासाठी त्याने बरीच वर्षे घाम गाळला आहे. त्यामुळे आता स्विंग बॉलिंग हे त्याचे हत्यार बनले आहे.
डेल स्टेन आहे आदर्श
शिवम मावी दीर्घकाळ आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्ससोबत राहिला. यादरम्यान त्याने आपल्या गोलंदाजीने अनेकवेळा प्रभावित केलं. पण टीम इंडियात त्याला अजूनपर्यंत स्थान मिळालं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने आपल्या गोलंदाजीत प्रतिभा सिद्ध केली. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरच त्याला भारतीय संघात संधी मिळाली. मावी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला आपला आदर्श मानतो.
श्रीलंकेविरुद्ध भारताचा टी20 संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
हे देखील वाचा-