एक्स्प्लोर

यशस्वीच्या खडतर प्रयत्नाला यश, भारतीय संघात पदार्पणाची संधी, जाणून घ्या कामगिरीविषयी

Yashasvi Jaiswal : मुंबई रणजी संघातील युवा खेळाडू यशस्वी जायस्वाल आज भारतीय कसोटी संघात पदार्पण करणार आहे.

Yashasvi Jaiswal Profile And Career : मुंबई रणजी संघातील युवा खेळाडू यशस्वी जायस्वाल आज भारतीय कसोटी संघात पदार्पण करणार आहे. यशस्वीचा भारतीय संघात पोहचण्याचा मार्ग सोपा नव्हता. मूळचा उत्तरप्रदेशचा असणारा यशस्वी जायस्वाल क्रिकेटसाठी लहानपणीच मुंबईत आला होता.. त्यावेळी त्याच्या डोक्यावर छतही नव्हते.. खाण्याचेही वांदे असायचे... कठीण परिस्थितीवर मात करत यशस्वीने स्वत:ला सिद्ध केले. यशस्वी जायस्वाल याने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये राजस्थानसाठी खोऱ्याने धावा काढल्या. धावांचा पाऊस पाडल्यानंतर यशस्वीला टीम इंडियाची दारे उघडली. यशस्वी जायस्वाल आज भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. 

यशस्वी जायस्वाल आतापर्यंत इंडिया अंडर-19 ए, इंडिया अंडर-19, इंडिया अंडर-23, फर्स्ट क्लास सामन्यात मुंबईकडून आणि रेस्ट ऑफ इंडियासाठी खेळला आहे. त्याशिवाय आयपीएलमध्ये तो राजस्थान संघाचा सदस्य आहे. 21 वर्षीय जायस्वाल याचा जन्म 28 डिसेंबर 2001 मध्ये उत्तरप्रदेशमधील छोट्या गावात झाला. आता तो भारतीय संघाकडून पदार्पण करत आहे. यशस्वीचा प्रवास अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे.  यशस्वी जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा आहे. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली.  त्यानंतर अनेक दिव्य पार करत आज तो यशाच्या एका अत्युच्य शिखरावर जाऊन पोहोचला आहे. 

यशस्वी जायस्वाल याने विजय हाजरे ट्रॉफी आणि ईरानी चषकात द्विशतक झळकावले आहे. 2019 च्या विजय हजारे चषकात त्याने 203 धावांची खेळी केली होती. 2022-23 मध्ये मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या ईरानी चषकातील सामन्यात 213 धावांची खेळी केली होती. 

आतापर्यंतचे यशस्वी जायस्वालचे करिअर -

यशस्वाली जायस्वाल याने 2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले, आतापर्यंत झालेल्या 15 सामन्यातील 26 डावात त्याने 80.21 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 2 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याशिवाय 32 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 54 च्या सरासरीने 1511 धावांचा पाऊस पाडलाय, त्यामध्ये पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली.  57 टी 20 सामन्यात 30 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राईक रेटने त्याने 1578 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके ठोकली आहे. 

आयपीएलमध्येही यशस्वी जायस्वाल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 2020 मध्ये राजस्थानने यशस्वी जायस्वाल याला 2.4 कोटी रुपयात खरेदी केले होते. आतापर्यंत 37 सामन्यात त्याने 33 च्या सरासरीने आणि 149 च्या स्ट्राईक रेटने 1172 धावा काढल्या आहेत. 

आणखी वाचा :

ठरलं! यशस्वी जायस्वाल करणार कसोटीत पदार्पण, गिल तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मानं दिले संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaubeej 2024 Wishes : भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
भाऊबीजेनिमित्त लाडक्या भाऊरायाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्यातील गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
Embed widget