एक्स्प्लोर

Yash Dayal News : RCBचा वेगवान गोलंदाज जाणार तुरुंगात?, अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात कोर्टाने यश दयालची बेल फेटाळली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Yash Dayal Bail Rejected Jaipur Court News : यश दयालच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. जयपूरच्या पॉक्सो न्यायालयाने 24 डिसेंबर 2025 रोजी त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे.

Yash Dayal Bail Rejected Jaipur Court News : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. जयपूरच्या पॉक्सो न्यायालयाने 24 डिसेंबर 2025 रोजी त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी पोलिसांनी यश दयालविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यश दयालला होणार अटक?

जयपूर महानगर प्रथम येथील पॉक्सो कोर्ट क्रमांक-3 च्या न्यायमूर्ती अलका बन्सल यांनी निकाल देताना स्पष्टपणे सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवले असल्याचे दिसून येत नाही. तपासात आरोपीची भूमिका समोर आली असून त्याची सखोल चौकशी अजून बाकी आहे. मात्र, यश दयालसाठी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. त्याच्याकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय अजून खुला आहे. दरम्यान, या प्रकरणात अडकल्यापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.

जुलै 2025 मध्ये दाखल झाला होता गुन्हा

23 जुलै 2025 रोजी जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात एका 19 वर्षीय तरुणीने यश दयालविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार तरुणी स्वतःला एक उदयोन्मुख क्रिकेटपटू असल्याचे सांगते. तिचा दावा आहे की, 2023 मध्ये तिची यश दयालशी ओळख झाली, तेव्हा ती अवघी 17 वर्षांची अल्पवयीन होती.

पीडितेच्या आरोपानुसार, लग्नाचे आमिष दाखवून यशने तिचे भावनिक आणि शारीरिक शोषण केले. पहिली घटना 2023 मध्ये घडली, जेव्हा यशने तिला जयपूरमधील सितापुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार केला, असा आरोप आहे. हा प्रकार जवळपास दोन वर्षे सुरू होता, असेही तिने म्हटले आहे.

आरोप खोटे असल्याचा दयालचा दावा

सुनावणीदरम्यान यश दयालच्या वकिलांनी आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले. बचाव पक्षाने असा दावा केला की, दोघांमधील संबंध परस्पर संमतीने होते. तसेच, यश दयाल एक प्रतिष्ठित व्यावसायिक क्रिकेटपटू असून तो तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

वादात असूनही RCBचा यश दयालवर विश्वास

या गंभीर प्रकरणात अडकल्यानंतरही आरसीबी संघाने यश दयालवर विश्वास दाखवला आहे. आयपीएल 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला 5 कोटी रुपयांना संघात घेतले होते. मागील हंगामात त्याने संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर आयपीएल 2026 साठीही आरसीबीने यश दयालला रिटेन केले आहे.

हे ही वाचा -

Vijay Hazare Trophy News : विजय हजारे ट्रॉफीचा पहिला सामना गाजवला, रोहित-विराटचं शतक; आता दुसरा सामना कधी अन् कुठे रंगणार, Live स्ट्रिमिंग होणार?, जाणून घ्या A टू Z माहिती

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
...तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेऊ; सोलापुरात शरद पवारांच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
इकडं शिल्पा केळुसकरांनी एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला, निवडणूक आयोगानं सुद्धा ग्राह्य धरला; आता हायकोर्टाचा सुद्धा सुनावणीस नकार!
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; 'बिनविरोध'वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
मोठी बातमी! मला चक्कर येतेय, नारायण राणेंना भोवळ, थांबवलं भाषण; कालच दिले राजकीय निवृत्तीचे संकेत
Donald Trump on India: अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
अमेरिकेची धमकी, रशियाकडून भारताची तेल आयातीत घट; ट्रम्प म्हणाले, 'मोदींनी मला खूश करण्यासाठी हे केलं, त्यांना माहित होतं मी नाराज आहे'
BMC Election 2026: नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
नील सोमय्यांच्या वॉर्डात गडबडीचा अंदाज ठाकरेंना आधीच आला; शेवटच्या क्षणी डाव कसा फिरवला, अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सगळंच सांगितलं
Airoli-Katai Naka Freeway: नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
नवी मुंबईवरुन कल्याण - डोंबिवलीत 15 मिनिटांत जाता येणार; फ्रीवेचं 80 % काम झालं, खाडीवरून रस्ता अन् भुयारी बोगदे .. कधी होणार सुरु?
Embed widget