Vijay Hazare Trophy News : विजय हजारे ट्रॉफीचा पहिला सामना गाजवला, रोहित-विराटचं शतक; आता दुसरा सामना कधी अन् कुठे रंगणार, Live स्ट्रिमिंग होणार?, जाणून घ्या A टू Z माहिती
Virat Kohli And Rohit Sharma Marathi News : भारताची सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या नवीन हंगामाची सुरुवात 24 डिसेंबर रोजी धमाकेदार झाली.

Virat Kohli And Rohit Sharma Next Match Vijay Hazare Trophy 2025 : भारताची सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या नवीन हंगामाची सुरुवात 24 डिसेंबर रोजी धमाकेदार झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी फलंदाजांनी मैदान गाजवले आणि शतकांचा रतीब रचला. एकूण 22 शतके पहिल्या दिवशी पाहायला मिळाली. यामध्ये माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार शतकांचा खास समावेश होता.
रोहित शर्माची तुफानी शतकी खेळी
दीर्घ काळानंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करत रोहित शर्माने मुंबईकडून जबरदस्त कामगिरी केली. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर सिक्किमविरुद्ध खेळताना रोहितने अवघ्या 62 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याच्या शतकातील 80 धावा या केवळ चौकार-षटकारांतून आल्या. लिस्ट-ए क्रिकेटमधील हे रोहितचे 37वे शतक ठरले. रोहितच्या बॅटमधून 155 धावांची झंझावाती खेळी पाहायला मिळाली. या खेळीत त्याने 18 चौकार आणि 9 षटकार लगावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘हिटमॅन’च्या या तुफानी शतकाच्या जोरावर मुंबईने सिक्किमचा 8 गडी राखून पराभव केला.
विराट कोहलीने दाखवला आपला क्लास
रोहितप्रमाणेच विराट कोहलीचाही बॅट विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी चालला. दिल्लीकडून खेळताना विराटने दीर्घ विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केले. बंगळुरूमध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध विराटने 83 चेंडूमध्ये शतक झळकावले. हे लिस्ट-ए क्रिकेटमधील त्याचे 58वे शतक ठरले. या शतकासह विराट कोहली लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 60 शतके करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या जागतिक विक्रमाच्या आणखी जवळ पोहोचला आहे. विराटच्या शतकी खेळीच्या बळावर दिल्लीने आंध्र प्रदेशवर 4 गडी राखून विजय मिळवला.
‘रो-को’ पुढील सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध?
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मधील पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दाखवलेल्या शानदार कामगिरीमुळे चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. आता दोन्ही दिग्गज पुढील सामन्यात कधी मैदानात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा पुढील सामना उत्तराखंडविरुद्ध 26 डिसेंबर रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा घरगुती क्रिकेटमध्ये रोहित शर्माची झलक पाहायला मिळणार आहे.
तर विराट कोहलीही 26 डिसेंबर रोजीच मैदानात उतरणार आहे. दिल्लीचा संघ त्या दिवशी बंगळुरूमध्ये गुजरातविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार असून, चाहत्यांना पुन्हा एकदा ‘किंग कोहली’चा जलवा पाहण्याची संधी मिळणार आहे.
विराट आणि रोहितच्या पुढच्या सामन्याचे Live स्ट्रीमिंग होणार का?
खरंतर, 'X' वरील एका वापरकर्त्याने स्टार स्पोर्ट्सला टॅग केले आणि विचारले की, विजय हजारे ट्रॉफीचे कोणते सामने आता थेट प्रक्षेपित केले जातील. स्टार स्पोर्ट्सच्या 'X' अकाउंटवरून मिळालेल्या प्रतिसादाला चाहत्यांनी पसंती दिली नाही. त्यात म्हटले आहे की, 26 डिसेंबर, शुक्रवारी झारखंड विरुद्ध राजस्थान आणि आसाम विरुद्ध जम्मू आणि काश्मीर सामने टीव्ही आणि हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जातील. म्हणजे याचा अर्थ असा की विराट आणि रोहितचा सामना टीव्हीवर दिसणार नाही.
हे ही वाचा -





















