WTC विजेत्या संघात मोठा ट्वीस्ट! आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बदलला, टेम्बा बावुमा बाहेर
ZIM vs SA Test News : 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला.

ZIM vs SA Test News : 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली शानदार खेळ दाखवला आणि सामना 5 विकेट्सने जिंकला. पण, आता दक्षिण आफ्रिकेचे लक्ष 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चक्रावर आहे. या चक्रातील सर्व कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून संघ पुन्हा अंतिम फेरीत पोहोचू इच्छितो. पण, आगामी कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार टेम्बा बावुमाला संघातून वगळण्यात आले आहे.
🏆 CHAMPIONS OF THE WORLD! 🇿🇦
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 14, 2025
A 5 wicket victory! The Proteas Men have conquered the Test arena, winning the ICC World Test Championship 2025 Final against Australia at the iconic Lord’s Cricket Ground 🏟️🙌
Undeniable. Unstoppable. Unrelenting. History made at the Home of… pic.twitter.com/twI21o7GmV
टेम्बा बावुमा बाहेर...
टेम्बा बावुमाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याला हॅमस्ट्रिंगच्या समस्येने ग्रासले होते. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. दुखापतीची तीव्रता तपासण्यासाठी त्याला पुढील स्कॅन करावे लागतील.
Proteas Men’s Test captain Temba Bavuma has been ruled out of the upcoming two-match Test series against Zimbabwe due to a left hamstring strain.
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 20, 2025
Bavuma sustained the injury while batting during South Africa’s second innings on day three of the ICC World Test Championship Final… pic.twitter.com/MW9dXrA4r2
अशा परिस्थितीत, बावुमा झिम्बाब्वेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बाहेर आहे. त्याच्या जागी संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज केशव महाराजला कर्णधार बनवण्यात आले आहे. 2 सामन्यांची कसोटी मालिका 28 जूनपासून सुरू होईल, ज्यातील शेवटचा सामना 6 जुलैपासून खेळला जाईल.
झिम्बाब्वेविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2025 मध्ये सीएसकेसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसला प्रोटीज संघातही संधी मिळाली आहे. आयपीएल व्यतिरिक्त, त्याने दक्षिण आफ्रिका अंडर 19 संघासाठी चमत्कार केले.
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ
केशव महाराज (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, मॅथ्यू ब्रीट्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस, कॉर्बिन बॉश, टोनी डी जोरजी, झुबैर हमजा, केशव महाराज, क्वेना म्फाका, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, लुआन-ड्रे प्रिटोरियस, लेसेगो सेनोकवेन, प्रेनेलन सुब्रायन, काइल व्हेरेन, कोडी यूसुफ.
हे ही वाचा -





















