एक्स्प्लोर
Sai Sudharsan Duck : पहिल्याच पेपरमध्ये 'सुदर्शन' नापास, पदार्पण सामन्यात नावावर झाला लाजिरवाणा विक्रम, नेमकं काय घडलं?
Sai Sudharsan Duck Eng vs Ind 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज साई सुदर्शनच्या लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे.
Sai Sudharsan Duck Eng vs Ind 1st Test News
1/10

भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज साई सुदर्शनच्या लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे.
2/10

23 वर्षीय सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही याबद्दल आधीच शंका होती, कारण करुण नायर उत्तम फॉर्ममध्ये आहे.
3/10

परंतु संघ व्यवस्थापनाने साईवर विश्वास व्यक्त केला आणि त्याला कसोटी कॅप देण्यात आली.
4/10

भारताने प्रथम फलंदाजी सुरू केली आणि केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. त्यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 91 धावा जोडल्या.
5/10

परंतु लंचच्या आधी राहुल 42 धावांवर बाद झाला.
6/10

राहुल बाद होताच साई सुदर्शन क्रीजवर आला, पण साई खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
7/10

यासह, साई सुदर्शन 14 वर्षांत कसोटी पदार्पणात शून्य धावांवर बाद होणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
8/10

यापूर्वी 2010 मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूर कसोटीत वृद्धिमान साहा देखील कसोटी पदार्पणात शून्य धावांवर बाद झाला होता.
9/10

रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव देखील कसोटी पदार्पणात शून्य धावांवर बाद झाले होते, परंतु त्यांना फलंदाज मानले जात नाही.
10/10

साई सुदर्शन बाद होताच, पंचांनी लंच घोषित केले. भारताचा स्कोअर तेव्हा 2 बाद 92 धावांवर होता.
Published at : 20 Jun 2025 06:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























