WTC 2025 Points Table Ind vs Aus Test : टीम इंडियाने पुन्हा गाठले शिखर, ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, जाणून घ्या समीकरण
भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
![WTC 2025 Points Table Ind vs Aus Test : टीम इंडियाने पुन्हा गाठले शिखर, ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, जाणून घ्या समीकरण WTC Points Table 2023-25 after ind vs aus Perth Test India reclaim No-1 spot with win over Australia in 1st BGT match Cricket News Marathi WTC 2025 Points Table Ind vs Aus Test : टीम इंडियाने पुन्हा गाठले शिखर, ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, जाणून घ्या समीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/2067fd5ad11f3550c184d09720659de217325231216051091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WTC Points Table 2023-25 after ind vs aus Perth Test : भारताने पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) आशाही जिवंत ठेवल्या आहेत. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला आता आणखी तीन सामने जिंकावे लागणार आहेत.
Jasprit Bumrah leads India to a memorable victory in Perth.#WTC25 | #AUSvIND 📝: https://t.co/jjmKD0eEV6 pic.twitter.com/nBrBnPJF25
— ICC (@ICC) November 25, 2024
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने गुणतालिकेत शिखर गाठले आहे. त्याच्या गुणांची टक्केवारीही 58.33 वरून 61.11 वर सुधारली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 13 सामन्यांतील चौथ्या पराभवासह दुसऱ्या स्थानावर घसरण केली. त्याच्या गुणांची टक्केवारी 57.69 इतकी आहे. याशिवाय गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. पर्थमधील ऑप्टस येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथमच पराभव पत्करावा लागला आहे.
India conquer Perth 💪#WTC25 | #AUSvIND pic.twitter.com/FCXTSJKbWx
— ICC (@ICC) November 25, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी सामन्यानंतर भारत पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन दुसऱ्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांची विजयाची टक्केवारी 55.56 आहे, तर न्यूझीलंडचा संघ 54.55 टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानावर असून तो न्यूझीलंडपेक्षाही मागे नाही. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 54.17 आहे. इंग्लंडचा संघ 40.79 टक्के विजयासह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी केवळ 33.33 आहे. इंग्लंड 27.50 विजयाच्या टक्केवारीसह 8 व्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज 18.52 टक्के विजयाच्या टक्केवारीसह शेवटच्या म्हणजे 9व्या स्थानावर आहे.
India round up their biggest Test win by margin of runs in Australia after an all-round show in Perth 🏏#WTC25 #AUSvIND https://t.co/Cg4dCEZTeb
— ICC (@ICC) November 25, 2024
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 सायकलनंतर पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी असणारे दोन संघ फायनलमध्ये खेळतील. जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका तसेच न्यूझीलंड हे देश या शर्यतीत आहेत. मात्र, सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्याची अधिक शक्यता वाटत आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)