एक्स्प्लोर
AUS vs SA : WTC फायनलमध्ये रबाडाचा पंजा, लॉर्ड्सवर कांगारूंना 'सळो की पळो' करून सोडले; संपूर्ण संघ 212 धावांवर गारद
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
WTC final AUS vs SA Latest News
1/10

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
2/10

कांगारू संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण 67 धावांच्या अंतराने 4 बळी पडले.
3/10

उस्मान ख्वाजा खातेही उघडू शकला नाही.
4/10

तर ट्रॅव्हिस हेड अवघ्या 11 धावा काढून बाद झाला.
5/10

स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने 79 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढले. 66 धावा करून स्मिथ बाद झाला.
6/10

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या अष्टपैलू ब्यू वेबस्टरने 72 धावा केल्या.
7/10

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 212 धावांवर संपला.
8/10

एकूण 5 विकेट घेणाऱ्या कागिसो रबाडासमोर कांगारू संघाचे फलंदाज काहीच करू शकले नाहीत.
9/10

रबाडा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 5 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
10/10

कागिसो रबाडाशिवाय मार्को जॅनसेननेही 3 विकेट घेतल्या. त्याच वेळी, एडेन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Published at : 11 Jun 2025 09:34 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रिकेट


















