WTC 2025-27 Points Table : ओव्हल कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची मोठी झेप, तर पराभवानंतर इंग्लंडला धक्का
England vs India 5th Test Update : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना सहा धावांनी जिंकत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.

WTC Points Table Update After Team India Win Oval Test : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना सहा धावांनी जिंकत मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) 2025-27 या नव्या चक्रातील भारताची पहिलीच मालिका होती. विशेष म्हणजे, भारताने या दौऱ्यात गिलच्या नेतृत्वाखाली खेळली आणि त्याने प्रथमच लाल चेंडूच्या स्वरूपात कर्णधारपदाची धुरा सांभाळली. जरी भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकू शकला नाही, तरी अत्यंत थरारक अशा शेवटच्या सामन्यात विजय मिळवत त्यांनी इंग्लंडच्या हातातून विजय हिसकावून घेतला.
A thrilling end to a captivating series 🙌#TeamIndia win the 5th and Final Test by 6 runs
— BCCI (@BCCI) August 4, 2025
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE
#ENGvIND pic.twitter.com/9ybTxGd61A
डब्ल्यूटीसी गुणतालिकेत मोठा बदल
या ओव्हल टेस्टमधील विजयामुळे भारताला WTC गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी भारत चौथ्या स्थानावर होता, पण आता तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे, तर इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरला आहे. भारताने आतापर्यंत 5 सामने खेळले असून, त्यापैकी 2 जिंकले, 2 हरले आणि 1 सामना अनिर्णित राहिला. सध्या भारताकडे 28 गुण असून त्याची PCT (पॉइंट्स परसेंटेज) 46.67 आहे.
भारताच्या पुढे पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे, ज्याने 3 पैकी सर्व 3 सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानी श्रीलंका आहे, ज्याने 2 सामने खेळले असून त्यापैकी 1 जिंकला आणि 1 ड्रॉ झाला आहे. इंग्लंडनेही 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 जिंकले, 2 हरले आणि 1 सामना ड्रॉ झाला आहे.
सिराजने इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवला. भारताने 374 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 367 धावांवर गारद झाला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती आणि भारताला चार विकेट्सची आवश्यकता होती. आज सिराजने तीन विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. सिराजने डावात पाच विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट्स घेतल्या. आकाश दीपने एक विकेट घेतली. यासह, पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा संघाची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. या दौऱ्यापूर्वी कोणत्याही क्रिकेट पंडितांनी भारताला फेव्हरिट म्हटले नव्हते. पण, गिलच्या युवा संघाने सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली.
पहिल्या डावात भारताने 224 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला आणि इंग्लिश संघाने 23 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या आणि एकूण 373 धावांची आघाडी घेतली आणि 374 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा दुसरा डाव 367 धावांवर संपला. जो रूटच्या 105 धावा आणि हॅरी ब्रूकच्या 111 धावा इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. सिराजने शेवटच्या विकेट म्हणून यॉर्करने अॅटकिन्सनला क्लीन बोल्ड करताच, भारतीय चाहते आणि खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. सिराज धावला आणि भारतीय खेळाडू त्याला मिठी मारण्यासाठी धावले.
हे ही वाचा -





















